आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या सिद्धार्थ कॉलेजच्या माजी ट्रस्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज दुपारी बाराच्या सुमारास जोरदार चकमक झाली. प्रकाश आंबेडकर आज सिद्धार्थ कॉलेजच्या ट्रस्टचा ताबा घेण्यासाठी कॉलेजमध्ये आले होते. पण आधीच्या ट्रस्टींना हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे आंबेडकर यांना तेथे येण्यास विरोध करण्यात आला. त्यांना रोखण्यासाठी हजारो कार्याकर्ते या भागात जमले होते. मात्र विरोध होताच आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी राडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोध असणा-या ट्रस्टीने हल्लाबोल सुरु केला. त्यामुळे महाविद्यालयात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी पाचारण करण्यात आले. पोलिसांना तणाव कमी करण्यासाठी लाठीमार करावा लागला.
दरम्यान, दोन गटात धुमश्चक्री होताच त्याचे पडसाद राज्यभर उमटले. औरंगाबादमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी दोन बसेस फोडल्या तसेच ९ कारची तोडफोड केली. अकोल्यातही त्याचे पडसाद उमटले.
सिद्धार्थ कॉलेजच्या ट्रस्टपदावरुन वाद सुरु होता. मात्र कोर्टाने प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे ते पदभार स्विकारण्यास कॉलेजमध्ये आले होते.
संसदेत जाणारे राजकारणी सापडले भ्रष्टाचाराच्या गर्तेत - अँड. प्रकाश आंबेडकर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.