आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षली भागात राहून करतात लोकांची सेवा, घरी आहेत हिंस्त्र प्राणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्या विचारांमुळे व मानवतेतून केलेल्या कामांमुळे लाखो लोकांचे जीवन बदलून गेले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याचे नाव आहे समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे. डॉ. आमटे हे एक असे व्यक्ती आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागात घनदाट जंगलात राहत आदिवासी लोकांना शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून दिली. केवळ मानसांनाच नव्हे तर डॉ. आमटे ने यांनी जंगलात प्राण्यांसाठी अनाथालय उभारले आहे. स्थानिक लोक जंगलातील प्राण्यांची शिकार करतात तर अनेक प्राणी-पक्षी जखमी होतात. अशा प्राण्यांना जीवदान लाभावे व त्यांचा अधिवास, रहिवास नैसर्गिक राहावा या हेतूने हे प्राणी अनाथालय उभारले गेले आहे. आज या अनाथालयात बिबटे, अस्वल, वाघ, मगर यासारखे सुमारे 60 पेक्षा अधिक प्राणी आहेत.
वडिलांनी सुरु केले होते काम-
डॉक्टर प्रकाश आमटे यांचे वडील बाबा आमटे यांनी महाराष्ट्रातील गडचिरोलीतील हेमलकसा भागात एक लोक बिरादरी प्रकल्पाची स्थापना केली होती. त्याद्वारे ते स्थानिक आदिवासी लोकांना आधुनिक जग दाखविण्याचा प्रयत्न करायचे. चांगली आरोग्य सेवा, शिक्षण, आहार व आधुनिक जगाची माहिती आदिवासींना दिली जायची. बाबा आमटेंच्या निधनानंतर डॉ. प्रकाश आणि त्यांचा मुलगा अनिकेत, दिगंत हे जबाबदारी संभाळत आहेत.
आदिवासींना देतात मोफत शिक्षण-
बाबा आमटेंचे मूळ विचार आजही लोकांना हेमलकसामध्ये आल्यावर पाहायला मिळतात. आजही तेथे आदिवासी मुलांना मोफत शिक्षण, एकवेळचे भोजन, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिले जाते. येथून शिकून बाहेर पडलेले अनेक युवक-युवती पुढे सरकारी अधिकारी, पोलिस कर्मचारी, वन कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. मात्र, येथील बहुतेक मुली या भागातील लोकांच्या विकासासाठी झटत आहेत.

घरी पाळले आहेत हिंस्त्र जंगली प्राणी-

आमटे कुटुंबियांनी हेमलकसा येथे स्थानिक लोकांकडून शिकारी दरम्यान जखमी झालेल्या प्राण्यांसाठी अनाथालय सुरु करण्यात आले आहे. यात आज 60 प्राणी आहेत. प्रकाश आमटे जेथे राहतात तेथेच हे अनाथालय बांधले गेले आहे. चंद्रपुरपासून 150 किमी दूर असलेला हा भाग नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या अनाथालयात मगरी, अस्वले, बिबटे, वाघ, हरिण, जंगली कुत्रे आदी जंगली प्राणी राहत आहेत.
चित्रपटही बनला आहे-
डॉ. प्रकाश आमटे यांच्यावर गेल्या वर्षी (2014) एक मराठी चित्रपट आला होता. ज्याचे नाव डॉ. प्रकाश आमटे 'THE REAL HERO' असे होते. या चित्रपटात डॉ. आमटे यांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी केली होती.