आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pramod Mutalik News In Marathi, Shrim Sena, Diva Marathi

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कठोर कायदा करा, श्रीराम सेनेचे मुतालिक यांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली बिगरमुस्लिम मुलींना प्रेमात फसवून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्याचे षड्यंत्र करणारी एक मोठी टोळी देशात कार्यरत आहे. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, दिल्ली, आंध्रसह इतर राज्यांत अशा अनेक घटना घडत आहेत. या षड्यंत्राची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्वतंत्र कठोर कायदा करण्यात यावा,’ अशी मागणी श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

मुतालिक म्हणाले, ‘शहान शाह व सिराजुद्दीन विरुद्ध केरळ शासन’ या खटल्याच्या प्रकरणातून लव्ह जिहादचा प्रकार सर्वप्रथम देशासमोर आला होता. मात्र, आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांना लव्ह जिहाद काय आहे हेच माहीत नसेल, तर ते अज्ञान दूर करण्यासाठी लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना वा त्यांच्या नातेवाइकांना घेऊन गृहमंत्र्यांसमोर सादर करण्यास आम्ही तयार आहोत.
केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनीही नुकतेच लव्ह जिहादची एकही अधिकृत तक्रार नसल्याचे म्हटले होते. मात्र, महाराष्ट्रात एक-दोन नव्हे, तर २२ लव्ह जिहादच्या तक्रारींची नोंद झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस महासंचालकांनी ‘आरटीआय’अंतर्गत दिलेली आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी ही माहिती महाराष्ट्र शासनाकडून मागवावी व लव्ह जिहादच्या विरोधात कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचेही मुतालिक म्हणाले.