आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणव मुखर्जी आज बाळासाहेबांना भेटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - युपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणब मुखर्जी शुक्रवारी मुंबईत येत असून काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. संध्याकाळी चार वाजता ते मुंबईत दाखल होणार असून विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ते कॉँग्रेसच्या आमदारांना भेटतील. रात्री साडेआठच्या सुमारास ते बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. शिवसेनेने मुखर्जी यांना पाठिंबा दिल्याने आभार मानण्यासाठी ही भेट ठाकरेंच्या निवासस्थानी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.