आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pranab Mukherjee Election Campaign In Mumbai, Meet Balasaheb

पवारांच्या मध्यस्थीने प्रणव मुखर्जी यांनी घेतली बाळासाहेबांची भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रपतिपद हे केवळ शोभेचे पद नसून काही महत्त्वाच्या जबाबदार्‍याही सांभाळून संविधानाचे संरक्षण करावे लागते, असे प्रतिपादन यूपीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीमध्ये केले.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदारांची भेट घेण्यासाठी मुखर्जी शुक्रवारी मुंबईत आले होते. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये कॉँग्रेस आमदारांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबद्दल टीव्हीवर कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही. अमेरिका, फ्रान्ससारख्या देशांमध्ये राष्ट्रपती थेट निवडला जातो. पण भारतात ही निवड थेट नसते. अधिकार मंत्र्यांच्या हातात असतात. त्यामुळे चर्चा धोरणात्मक निर्णयावर होऊ शकते, वैयक्तिक विषयांवर नाही. राष्ट्रपती संविधानाचे संरक्षण करण्याची शपथ घेतो. तसेच आपले संविधान केवळ वैधानिक कागद नसून त्यापेक्षा त्याचे महत्त्व खूप जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.
आपण मुंबईमध्ये ज्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीच पहिल्यांदा आपले नाव राष्ट्रपतिपदासाठी सुचवल्याचे ते म्हणाले. समाजवादी पक्ष, बीएसपी, आरजेडी, जेडी (एस) आदी पक्षांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे आपल्यामागे उभ्या असलेल्या पक्षांची ताकद दिसून येते, असे ते म्हणाले.
आपल्या भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय विषयांवर उत्तरे देण्यास नकार दिला. मात्र राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पक्षांच्या माध्यमातून निवडणूक होत असल्याने त्या पक्ष सदस्यांची भेट घेणे आपल्याला महत्त्वाचे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपण स्वत:ला कोणावरही लादू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रणवदा ‘मातोश्री’वर- प्रणवदांनी शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेतली. या वेळी शरद पवारही त्यांच्यासोबत होते. बैठकीनंतर प्रणवदा म्हणाले की, शिवसेनेने मला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. ठाकरे म्हणाले की, संगमा हेही माझे जुने मित्र आहेत. मात्र दोस्ती व जातीच्या नावावर राष्ट्रपतीची निवडणूक होत नसते. अफजल गुरू व बेळगावच्या मुद्दय़ावर आपण त्यांच्याशी काही चर्चा केली काय, या प्रश्नावर बाळासाहेब म्हणाले की, या दोन्ही मुद्दय़ांवर चर्चा केली. मात्र त्याबाबत मी आताच जाहीरपणे सांगू शकत नाही. युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणब मुखर्जी यांनी आज रात्री नऊच्या सुमारास मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
या दोन्ही दिग्गज नेत्यांचा राजकीय प्रवास पाहता ही भेट ऐतिहासिक मानावी लागेल. तसेच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे ही यावेळी प्रणव मुखर्जी यांच्यासोबत मातोश्रीवर उपस्थित होते.
एनडीएसोबत असतानाही त्यांच्या भूमिकेविरोधात जाऊन शिवसेनेने युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मुखर्जी यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी मुखर्जी यांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. तत्पूर्वी मुखर्जी यांनी वाय. बी. चव्हाण सभाग्रहात कॉँग्रेसच्या आमदारांची भेट घेतली.
मुखर्जी जिंकून येतील - शरद पवार : शरद पवारयांनी आपल्या भाषणामध्ये मुखर्जी जिंकून येतील याबद्दल विश्वास व्यक्त केला. मात्र त्यामुळे आपल्या शेजारुन त्यांना राष्ट्रपतीच्या रायसिना हिल्समध्ये रहायला जावे लागेल, असे ते म्हणाले. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी व आमदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मनमोहनसिंग जागतिक पातळीवरील हास्यास्पद प्राणी
ठाकरे- प्रणवदा भेटीदरम्यान पवारांची 'TEA DIPLOMACY'
शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय प्रणव विजयी होणे शक्य नाही