मुंबई - "बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्याप्रकरणी रविवारी नवा खुलासा करण्यात आला. प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज सिंह याचे अनेक तरुणींशी संबंध असल्याचे पोलिस चौकशीदरम्यान स्पष्ट झाले.
दरम्यान, या प्रकरणी चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात अालेल्या राहुलला अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अाहे. रविवारी राहुलची पोलिसांनी चौकशी केली. गेल्या १५ दिवसांपासून तो इतरत्र राहत होता. तसेच त्याचे अनेक तरुणींशी संबंध होते. त्यामुळे प्रत्युषा मानसिक तणावाखाली होती. पैशाच्या कारणावरूनही दोघांत अनेकदा भांडणे होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रत्युषाची आई शोमा यांनी तिला राहुलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिने आपल्या आईचे ऐकले नाही. प्रत्युषाची मैत्रीण लीना इब्रा हिनेही माध्यमांना सांगितले, राहुल गेल्या काही दिवसांपासून सलोनी शर्मा या तरुणीसोबत फिरत होता.
प्रत्युषा गर्भवती?
प्रत्युषा दोन महिन्यांची गर्भवती होती, असे सांगण्यात येत आहे. या वृत्ताला डॉ. एस. एम. पाटील यांनीही दुजोरा दिला. पोलिस सध्या प्रत्युषाच्या मित्रांची चौकशी करत आहेत. यात प्रामुख्याने पुरुष मित्रांचा समावेश आहे.
पुढील स्लाइडमध्ये, प्रत्युषाचा व्हॉट्सअॅप स्टेटस...