आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-8: मुंबईच्या खेळाडूने प्रवीण तांबेला दिली होती फिक्सिंगची ऑफर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी आयपीएल कमिश्नर ललित मोदी यांच्याशी संबंधित वाद सुरु असतानाच आता पुन्हा एकदा क्रिकेट वादाची बातमी पुढे आली आहे. यंदा पार पडलेल्या IPL-8 या स्पर्धेदरम्यान राजस्थान रॉयल्सचा लेग स्पिनर प्रवीण तांबे याला मुंबईच्या एका क्रिकेटपट्टूने मॅच फिक्सिंगची ऑफर दिल्याचे समोर येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार वरील वृत्त छापले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, गुन्हे अन्वेषण विभाग याबाबतची चौकशी करीत आहे तसेच अहवालात काही आढळले तर कारवाई केली जाईल, असे या सूत्रांनी म्हटले आहे.
विषय ऐरणीवर येणार
यंदा पार पडलेला IPL-8 हा हंगाम हा ‘कंट्रोवर्सी फ्री’ मानला जात होता. मात्र या खुलाशानंतर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इंग्रजी वृत्तमानपत्राच्या वृत्तानुसार, प्रवीण तांबेला आपल्याला ऑफर मिळाल्याची माहिती बीसीसीआयला दिली होती. यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने घटनेशी चौकशी सुरू केली आहे. मात्र ज्या खेळाडूने तांबेला फिक्सिंगची ऑफर दिली होती त्या खेळाडूचे नाव पुढे आले नाही. हे प्रकरण दोन महिन्यापूर्वीचे आहे.
बीसीसीआयच थोपटून घेत आहे पाठ -

हे प्रकरण समोर आल्यानंतर बीसीसीआयचे सेक्रेटरी अनुराग ठाकुर यांनी म्हटले आहे की, आम्ही खेळाडूंना फिक्सिंगपासून दूर राहण्यासाठी जे ट्रेनिंग दिले आहे त्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळेच अशा तक्रारी येत आहेत. मात्र, ठाकुर यांनी ऑफर देणा-या खेळाडूचे नाव जाहीर केले नाही. आपल्याला माहित असेलच की, राजस्थान रॉयल्स संघात मुंबईचे पाच खेळाडू आहेत. यात अजिंक्य रहाणे, प्रवीण तांबे, दिनेश साळुंखे, धवल कुलकर्णी आणि अभिषेक नायर याचा समावेश आहे. वर्ष 2013 मध्येही आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले होते.
मुंबईसाठी समस्या-
प्रवीण तांबेने केलेला ताजा खुलासा मुंबईसाठी समस्या निर्माण करू शकतो. मुंबईच्या रणजी संघाच्या संभाव्य 30 खेळाडूंची निवड दरवर्षी जुलै महिन्यात होते. मात्र, बीसीसीआयने आतापर्यंत तांबेला ऑफर देणा-या खेळाडूचे नाव जाहीर केले नाही. त्यामुळे मुंबई संघ निवडणा-या निवड समितीपुढे समस्या निर्माण झाली आहे. या खेळाडूला मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळू शकते मात्र नंतर त्याचे नाव जाहीर झाल्यास मुंबई संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष नितिन दलाल यांनी बीसीसीआयकडून अद्याप कोणत्याही खेळाडूबाबत कळविले नसल्याचे सांगितले.
प्रवीण तांबेने 41 व्या वर्षी केले होते आयपीएल डेब्यू-
मुंबईचा खेळाडू असलेल्या प्रविण तांबेने 2013 मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केले होते. तो आयपीएलच्या हंगामात आतापर्यंतचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. 2000 मध्ये मुंबई टीमकडून रणजी सामने खेळणा-या संभाव्य खेळाडूत नाव होते. 2012-13 मध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतील नॉकआउट पर्यंत तो मुंबई संघात होता. मात्र त्याला संधी मिळाली नव्हती. प्रवीण राजस्थान रॉयल्स शिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशन इलेव्हन, पारसी जिमखाना, शिवाजी पार्क जिमखाना, सेंट हेलेन्स रिक्रिएशन इन मर्सीसाइड इंग्लंड, विक्टरी क्रिकेट क्लब, लिव्हरपुल प्रीमियर लीग आणि डीवाय पाटील स्पोर्ट्स अॅकेडमीसारख्या 12 संघाकडून खेळला आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना प्रवीणने 7.55च्या सरासरीने एकून 23 विकेट घेतल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...