आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी प्रविणा ठाकूर विराजमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर यांची निवड झाली आहे. उपमहापौर पदी उमेश नाईक यांची निवड झाली आहे. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी (बविआ)ने वसई-विरार महानगरपालिकेची सत्ता एकहाती खेचून आणत 115 पैकी तब्बल 106 जागा जिंकल्या होत्या.
2010 सालीही झालेल्या महापालिका निवडणुकीत ठाकूर यांनी बहुमतासह सत्ता मिळवली होती. आता सलग दुस-यांदा बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. आज झालेल्या निवडणुकीत प्रविणा ठाकूर यांना 108 मते मिळाली. यंदाच्या निवडणुकीत प्रविणा ठाकूर या बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.
यंदाच्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर विरूद्ध इतर सर्वजण असे चित्र निर्माण झाले होते. तरीही ठाकूर यांनी वसई-विरार पटट्यात आपले एकहाती वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले होते. आपल्याला माहित असेलच की, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची म्हणजेच पर्यायाने भाजपची लाट असतानाही ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने या पट्ट्यातील तीनही जागा जिंकल्या आहेत.
शिवसेनेकडे 5 नगरसेवक, भाजप व काँग्रेसचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे. दोन ठिकाणी अपक्षांनाही बाजी मारली होती त्यांनी ठाकूरांच्या बविओसोबत जाणे पसंत केले आहे. राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आली नव्हती तर मनसेने या निवडणुकीपासून चार हात दूर राहणे पसंत केले होते.
वसई विरार येथील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर बहुमत दिल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. पुढील काळात महिलाच्या विकासाला प्राधान्य देणार आहे. शहरातली एकही मुलगी शिक्षणा पासून वंचित राहणार नसल्याचा संकल्प केल्याचे महापौर प्रविणा ठाकूर यांनी निवडीनंतर सांगिलते.
बातम्या आणखी आहेत...