आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pre Admission As It Maratha Reservation, Jobs Safe

मराठा आरक्षणात पूर्वीचे प्रवेश, नोक-या अबाधित - मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षित कोट्यातून दिलेले प्रवेश शासकीय- निमशासकीय सेवेमध्ये झालेल्या नियुक्त्या कायम ठेवण्याचा आणि त्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

शासकीय- निमशासकीय सेवेतील रिक्त पदे भरताना मराठा आरक्षणातील १६ टक्के जागा सोडून इतर प्रवर्गातील पदांची भरती करण्यात येणार आहे. स्थगितीपूर्वी आरक्षणानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेतील उमेदवारांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित विभागांनी करावी, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. जुलै २०१४ पासून मराठा आरक्षण लागू झाले होते. मात्र या आरक्षणाला १४ नोव्हेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम आहे.