मुंबई- राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. दक्षिण गोव्यात मान्सून दाखल झाल्यानंतर तळकोकणात आज मान्सून होईल. मात्र, त्याआधीच मान्सूनपूर्व सरी कोकण किनारपट्टीसह मुंबईत कोसळू लागल्या आहेत. मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. तर तिकडे पुण्यात ढगाळ वातावरण असून, पश्चिमेकडून गार वारा वाहत आहे. त्यामुळे पुण्यातही आज जोरदार सरी कोसळू शकतात अंदाज आहे.
दरम्यान, काही तासांतच मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबई, ठाणे व रायगड परिसरात आज पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी येथे मुसळधार पाऊस पडला. ठाणे व कल्याण पट्ट्यातही पाऊस पडत आहे. दादर, वरळी, लोअर परळ, चेंबूर, मुलुंडमध्ये परिसरात पाऊस कोसळत आहे. रायगड भागातील अलिबाग, पेण, उरण, कर्जत तालुक्यात पाऊसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईतही सर्वत्र पाऊस पडत आहे.
पहिलाच पाऊस अन् रेल्वे सेवा विस्कळित-
मुंबईत आज पहिल्याच पावसाला सुरुवात झाली. मात्र, पावसाला सुरुवात होताच मुंबईतील तीनही मार्गावर लोकल गाड्या विस्कळित झाल्या आहेत. सर्वच मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. या पावसाने मुंबईतील अनेक भागातील लाईट गायब झाली आहे. ईस्टर्न महामार्गावर पाणी साचले आहे.
पुण्यात ढगाळ वातावरण
पुण्यात शुक्रवार सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. तसेच हवेत गारवा आहे. कोकण किनारपट्टीकडून म्हणजेच्या पुण्याच्या पश्चिमेकडून गार वारे वाहत आहे. तळकोकणासह कोकण किनारपट्टीवर पाऊस पडत असल्याने पुण्यात आज पाऊस दाखल होईल असा अंदाज आहे. लोणावळा-खंडाळा-कार्ला परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मावळ-मुळशी भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.
पुढे वाचा, पुढील तीन मुंबई-पुणे परिसरात जोरदार पाऊस...