आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी प्रीती राठीचा अखेर रुग्णालयात मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महिन्याभरापूर्वी बांद्रा टर्मिनसवर अ‍ॅसिड हल्ल्यात भाजून गंभीर जखमी झालेल्या प्रीती राठीचा अखेर रूग्णालयात मृत्यू झाला. तिच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज तिची प्राणज्योत मालवली. प्रीतीवर २ मे रोजी अ‍ॅसिड हल्ला झाला होता. या हल्लात ती गंभीर जखमी झाली होती.

प्रीतीचा उजवा डोळा निकामी झाला होता. तसेच अ‍ॅसिडचे द्रावण तोंडात गेल्यामुळे तिच्या फुफ्फुसानेही काम करणे बंद केले होते. डॉक्टर तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होते मात्र त्यात त्यांना अपयश आले.