आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीती राठी अॅसिड हत्याप्रकरणी तिच्या नात्यातील तरूणास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिल्लीतून मुंबईत नोकरीसाठी आलेली तरूणी प्रीती राठी हिच्यावर अॅसिड हल्ला करून हत्या केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिल्लीतील तिच्या इमारतीत राहणा-या व नातेवाईक असणा-या अंकुर पालिवाल याला अटक केली आहे.
प्रितीला मुंबईतील नौदलाच्या सरकारी रूग्णालयात नोकरी लागल्याने अंकुरने ही सूडबुद्धीने हे कृत्य केल्याचे तपासात आढळून आले आहे. प्रीतीला सरकारी नोकरी मिळाली पण तुला मिळाली नाही असे अंकुरच्या घरातील लोकांनी त्याला बोलणी दिल्यानंतर त्याला प्रीतीचा राग येऊ लागला. त्या नैराश्यातून अंकुरने 2 मे 2013 रोजी वांद्रे टर्मिनसवर प्रीतीवर हल्ला केला. नोकरीत रूजू होण्यासाठी येत असतानाच अज्ञात व्यक्तीने अॅसिड टाकले होते. त्यात प्रीतीच्या फुफ्फूसात अॅसिड गेल्यामुळे तिची अन्ननलिका जळून खाक झाली होती. अखेर महिनाभर रूग्णालयात झुंज दिल्यानंतर प्रीतीची 1 जून 2013 रोजी मृत्यू झाला होता.
मात्र गेली सहा-सात महिने दिल्लीतून प्रथमच येत असलेल्या प्रीतीवर हल्ला कोणी केला याचा प्रश्न पडला होता. हा हल्ला तिच्या ओळखीच्या व्यक्तीनेच केला असावा असे मुंबई पोलिसांना वाटत होते. मात्र, तपासाची चक्रे फिरवूनही आरोपी हातात येत नव्हता. अखेर पोलिसांना क्ल्यू मिळाली आणि त्यांनी प्रीतीच्या इमारतीत राहणा-या अंकुर पालिवालला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
आणखी पुढे वाचा...