आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preeti Zinta May Contest Loksabha From Bjp Againest Priya Dutt

प्रिया दत्तला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराच्या शोधात, प्रिती झिंटाकडे विचारपूस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीचे रणशिंग आज फुंकले गेले असले तरी आपले योग्य उमेदवार जाहीर करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, बडया पक्षांचाही सक्षम उमेदवार निवडताना दमछाक होत आहे. मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपला काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांच्याविरोधात उमेदवार मिळत नाहीये. प्रिया दत्तला कडवे आव्हान देणारा व त्यांचा पराभव करू शकणा-या उमेदवाराच्या शोधात मुंबई भाजप आहे. प्रिया दत्तचा पराभव करायचा असेल तर बॉलिवूडमधील एकाला उमेदवारी दिली पाहिजे, असे भाजप नेतृत्त्वालाही वाटत आहे.
याचाच भाग म्हणून महाराष्ट्राचे प्रभारी राजीवप्रताप रूडी यांनी प्रिती झिंटा हिच्याशी चर्चा केल्याची चर्चा आहे. प्रिती झिंटा सक्रीय राजकारणात उतरण्यास इच्छुक आहे. त्यासाठी तिला आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. इतर राज्यांतही वेगवेगळ्या पक्षांनी आपापल्या मतदारसंगात चित्रपट क्षेत्रातील मंडळी, अभिनेते-अभिनेत्रींना तिकीट देण्यास इच्छुक आहेत. यात भाजपही आघाडीवर आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा या अभिनेत्रीला तिकीट दिले आहे. चित्रपट क्षेत्रातील मंडळी आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपही प्रयत्नशील आहे. प्रिती झिंटा राजकारणात येण्यास उत्सुक तिच्याशी भाजपने संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अधिक तपशील पुढे आला नाही.
भाजपने याआधी मराठी अभिनेता नाना पाटेकर यांना प्रिया दत्तच्या विरोधात लढविण्याची चाचपणी केली होती. मात्र, नानांनी भाजपची ऑफर धुडकावून लावल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण नानांनी जाहीर कार्यक्रमात माझ्या रोख-ठोक स्वभावामुळे कोणताही पक्ष दोन दिवसापेक्षा जास्त काळ पक्षात ठेवणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजप प्रिया दत्तच्या विरोधात एका सक्षम पण बॉलिवूड क्षेत्रातील मंडळीच्या शोधात आहे.