आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रिती-नेस वादप्रकरणी सचिनचा मुलगा अर्जुनची साक्ष होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेत्री प्रीती झिंटा आणि उद्योगपती नेस वाडिया प्रकरणात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा जबाब नोंदविण्याचा विचार मुंबई पोलिस करीत असल्याचे कळते आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरही उपस्थित होता. तसेच तो प्रिती आणि नेस वाडिया ज्या ठिकाणी बसले होते तेथेच तो बसला होता. प्रिती आणि नेस या दोघांत जेव्हा वाद सुरू होता त्याचा साक्षीदार अर्जुनही आहे अशी माहिती तेथील उपस्थितांनी पोलिसांना दिली आहे. मात्र, 14 वर्षीय अल्पवयीन अर्जुनला या प्रकरणाचे साक्षीदार बनवावे की नाही याचा विचार मुंबई पोलिस करीत आहे. याचबरोबर सचिन तेंडुलकरच्या कुटुंबियांना रूचेल का असाही प्रश्न मुंबईला पोलिसांना पडला आहे.
या प्रकरणाची चौकशी करणा-या पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रिती आणि नेस वाडियात वाद सुरु असताना अर्जुनने नेसला डिस्टर्ब करू नका असे बजावले होते. त्यावेळी नेसने अर्जुनला पण शिव्या घातल्या होत्या. याचबरोबर या दोघांच्या भांडणात अर्जुनने हस्तक्षेप केल्याने नेसने त्याला अपशब्द वापरल्याचे कळते. या घटनेचे व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर या बाबी पुढे आल्या आहेत.
आता या विनयभंगाच्या तक्रारीत अल्पवयीन अर्जुनची साक्ष नोंदवायची की नाही यात मुंबई पोलिस अडकले आहेत. सचिन याबाबत काय भूमिका घेतो यावरच ते अवलंबून असणार आहे.