आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- सोनसाखळी ओढून गर्भवती महिलेला ढकलले रेल्वेट्रॅकवर, लगेच झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच तरुणाने गर्भवती महिलेला रेल्वे ट्रॅकवर ढकलले. - Divya Marathi
याच तरुणाने गर्भवती महिलेला रेल्वे ट्रॅकवर ढकलले.
मुंबई- कुर्ला स्टेशनवर एका चेन स्नॅचरमुळे गर्भवती महिलेला हकनाक जीव गेला. लोकल ट्रेनची वाट बघत महिला प्लॅटफॉर्मवर उभी होती. यावेळी चेन स्नॅचर तरुणाने तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओढली. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यात तोल जाऊन ती रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. यावेळी या टॅकवर एक लोकल येत होती. त्याखाली येऊन महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोकांनी पाठलाग करुन या चेन स्नॅचरला पकडले.
अशी घडली दुर्घटना
- रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी पटेल रामकुमार यांनी सांगितले, की मंगळवारी रात्री सुमारे 8 च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर महिला लोकलची वाट बघत थांबली होती. तिचे नाव सपना शुक्ला आहे.
- ऑफिसमधून घाटकोपर येथे असलेल्या घरी जाण्यासाठी ती प्लॅटफॉर्मवर थांबली होती. तिचे लोकलकडे लक्ष होते.
- यावेळी रफी बैरागी चरण मलिक नावाचा तरुण आला. त्याने सपनाच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पळ काढला. तिने जरा विरोध केला. यात तिचे संतुलन बिघडले. गर्भवती असल्याने तिला भार सांभाळता आला नाही. ती प्लॅटफॉर्मवर पडली.
- या दरम्यान लोकल येत होती. तिच्याखाली सपना सापडली. 15 ते 20 मिनिटे प्रयत्न करुन प्रवाशांनी सपनाला ट्रेनच्या खालून बाहेर काढले. रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
- आरोपी 19 वर्षीय असून मुळचा ओरिसाचा आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...