आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेहांच्‍या ढिगाऱ्यात जिवंत राहिला हा चिमुकला, गर्भवती आईला दहशतवाद्यांनी ठार केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गव्रिएल हॉल्जबर्ग,  रिव्का आणि  चिमुकला मोशी - Divya Marathi
गव्रिएल हॉल्जबर्ग, रिव्का आणि चिमुकला मोशी
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्‍या मुंबईवर 26 नाव्‍हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्‍ला झाला. या घटनेला आज सात वर्षे झालीत. यामध्‍ये लष्‍कर- ए- तौयबाच्‍या 10 दहशतवाद्यांनी 59 तास मुंबईकरांना वेठीस धरून 164 निष्‍पाप लोकांचा जीव घेतला. यातील जिवंत पक‍डल्‍या गेलेल्‍या कासाब या दहशतवाद्याला फासावर लटकवले गेले. पण, तरीही या हल्‍ल्‍यातील जखमा अजून ताज्‍या आहेत. या हल्‍ल्‍यात भारतीयांबरोबर काही विदेशी नागरिकही मारले गेले. यात गव्रिएल हॉल्जबर्ग आणि त्‍यांची पत्‍नी रिव्का यांनाही प्राण गमवावे लागले. पण, त्‍यांचा दोन वर्षांचा मुलगा मोशी आणि तिची आया सॅन्ड्रा सॅम्युअल यातून सुखरुप बचावले. त्‍याची खास आठवण divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

5 महिन्‍यांच्‍या गर्भवतीवर AK47 मधून गोळ्या झाडल्‍या
26 नोव्‍हेंबर 2008 च्‍या रात्री जवळपास 9.45 वाजता चार दहशतवाद्यांनी लियोपोल्ड कॅफेवर फायरिंग केली. त्‍यानंतर ते एके 47 मधून गोळीबार करत नरीमन हाउसमध्‍ये घुसले. येथे त्‍यांनी सुरुवातीला ग्रेनेड हल्‍ला केला. त्‍यामुळे नरीमन हाउसमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दहशतवादी स्‍वयंपाकगृहात घुसले. तिथे अगोदरच गव्रिएल हॉल्जबर्ग आणि त्‍यांची पत्‍नी रिव्का लपलेले होते. त्‍यावेळी रिक्का या पाच महिन्‍यांच्‍या गर्भवती होत्‍या. दहशतवाद्यांनी त्‍यांच्‍यावर गोळ्या झाडल्‍या. यात त्‍यांचा मृत्‍यू झाला.
फ्रिज मागे लपला चिमुकला आणि त्‍याची आया
सॅन्ड्रा सैम्युअल ही नरीमन हाउसमध्‍ये मुलांच्‍या देखरेखीचे काम करत होती. हल्‍ल्‍याच्‍या वेळी ती दुसऱ्या खोलीत होती. तिने गोळ्यांचा आवाज ऐकताच ती स्‍वयंपाकखोलीत धावत आली. तिथे गव्रिएल आणि रिव्का यांच्‍या मृतदेहाजवळ चिमुकला मोशी बसलेला होता. दहशतवाद्यांच्‍या नजरेतून तो सुटला होता. सॅन्ड्राने तत्‍काळ मोशीला उचलले. त्‍याला घेऊन ती फ्रिजच्‍या कोपऱ्यात लपली. हे सर्व होत असताना मोशी शांत होता तो रडला नाही, असे सॅन्‍ड्राने सांगितले.
22 NSG च्‍या कमांडोने वाचवला जीव
येथे रात्रभर दहशतवादी आणि सुरक्षा सरक्षकांमध्‍ये चकमक सुरू होती. दुसऱ्या दिवशी NSG च्‍या 22 कमांडोची टीम हेलिकॉप्टरच्‍या मदतीने नरीमन हाउसमध्‍ये घुसली. काहीच तासांत त्‍यांनी दहशतवाद्यांचा खात्‍मा केला. यामध्‍ये हवलदार गजेंद्र सिंह शहीद शहीद झाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....