आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Preity Zinta Case To Recover Rs 2 Crore From Amrohi Family

प्रिती झिंटाला दिलासा : आमरोही कुटुंबियांना संपत्ती विकण्यास मनाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इस्टेटचा वाद मिटविण्यासाठी दोन कोटी रूपये दिल्यानंतर फसवणूक झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. याप्रकरणी ताजदार आमरोही व त्यांच्या कुटुंबियांना घर व घराची जागा न विकण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. तसेच पुढील सव्वा महिन्यात ताजदार व त्यांच्या कुटुंबियांनी कोर्टात याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे सांगितले आहे.
याबाबतची घटना अशी की, चित्रपट निर्माते असलेल्या शानदार आमरोही यांची आणि प्रिती झिंटाची चित्रपट व्यवसायामुळे ओळख होती. त्यामुळे काही वर्षापूर्वी शानदार यांनी प्रितीला सांगितले होते की, मला दोन कोटी रूपयांची गरज आहे. कारण माझ्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरु आहे. त्यासाठी मला पैशांची गरज आहे. जर मला मदत केली तर त्याबदल्यात तुला संपत्ती विकल्यानंतर व्याजासह रक्कम परत करेन. याबाबतची माहिती आमरोही कुटुंबियांना होती. मात्र, प्रितीने पैसे गुंतवल्यानंतर काही महिन्यानंतर शानदार यांचे निधन झाले. त्यामुळे आमरोही कुटुंबाने प्रितीने आम्हाला पैसे दिले नसल्याचे सांगितले व पैसे देण्यास नकार दिला.
पुढे वाचा, शानदार यांचे बंधू ताजदार यांनी केले होते प्रितीवर आरोप...