आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Premier Of Balkadu Marathi Cinema On Balasaheb Thackery\'s Life

‘बाळकडू’चा आज प्रीमियर: राजकीय-सामाजिक क्षेत्रातील दिग्गज लावणार हजेरी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर आधारित ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाचा आज ग्रॅण्ड प्रीमियर शो होणार आहे. लोअर परळच्या फिनिक्स ‘पीव्हीआर’मध्ये सायंकाळी साडेसहा वाजता मराठी सिनेसृष्टीतील पहिलाच ‘रेड कार्पेट’ सोहळा रंगणार आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
ग्रॅण्ड प्रीमियर सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राजकीय-सामाजिक क्षेत्रातील दिग्गज तसेच चित्रपटाचे सादरकर्ते शिवसेना नेते खासदार संजय राऊत, निर्मात्या स्वप्ना पाटकर, दिग्दर्शक अतुल काळे, अभिनेता उमेश कामत, नेहा पेंडसेसह ‘बाळकडू’ची अख्खी टीम उपस्थित राहणार आहे. दरम्यान, ‘बाळकडू’ उद्यापासून (23 जानेवारी) मुंबईसह महाराष्ट्रातील सुमारे 500 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला पाजलेले अन्यायाविरुद्ध लढण्याचे ‘बाळकडू’ हा या चित्रपटाचा आत्मा आहे. ‘तुम्ही बोलवले, मी येतोय!’ ही या चित्रपटाची शिवसेनाप्रमुखांच्या आवाजातील टॅगलाइनसुद्धा लोकप्रिय झाली आहे. अजित-समीर या संगीतकार जोडीने स्वरबद्ध केलेला चित्रपटातील पोवाडा गाजतो आहे. व्हॉट्सऍप, फेसबुक, यू-ट्यूब यासारख्या सोशल साईटवर वेगाने फिरणार्‍या चित्रपटाच्या मर्मभेदी प्रोमोजमुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट कमालीचा औत्सुक्याचा विषय बनला आहे.
पुढे वाचा, बाळकडूशी संबंधित माहिती...