आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओखी चक्रीवादळाचे महापरिनिर्वाण दिनावर सावट; शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ओखी चक्रीवादळाचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनावर सावट निर्माण झाले आहे. वादळामुळे मुंबईसह उपनगरात कालपासून (सोमवार) संततधार पाऊस सुरु आहे. शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल झाला आहे. परिणामी चैत्यभूमीवर   डॉ.आंबेडकरांना अभिवादन देशाच्या कान्याकोपर्‍यातून आलेल्या भीमबांधवांची गैरसोय झाली आहे.

 

शिवाजी पार्कावरील दूरवस्थेबाबत गायक नंदेश उमप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पीकर लावण्याची विनंती महापालिकेकडे केली आहे. मुंबईबाहेरुन आलेल्या अनुयायांची राहण्याची सोय यंदा शिवाजी पार्कमधील शेल्टरऐवजी महापालिकेच्या 70 शाळांमध्ये करण्यात आली आहे. तसेच सोयीसाठी शिवाजी पार्क परिसरात खासगी बस, बेस्ट बस सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

एस. व्ही. एस. रोड, रानडे रोड, एन. सी. केळकर रोड, केळुस्कर रोड (दक्षिण), केळुस्कर (उत्तर)
गोखले रोड,  दक्षिण व उत्तर टिळक ब्रीज, भवानी शंकर रोड, एस. के. बोले मार्ग, सेनापती बापट मार्ग, फाइव्ह गार्डन्स, माटुंगा, माहिम रेती बंदर येथे वाहनांच्या पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... शिवाजी पार्कच्या दुरवस्थेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...