आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: सोने मिळवण्‍यासाठी पाच फुट खड्ड्यात नरबळीचा प्रयत्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील कुरारमध्‍ये असलेल्‍या एका झोपडीत बालकाचा नरबळी देण्‍याचा प्रयत्‍न केला जात असल्‍याचा संशय परिसरातील नागरिकांनी व्‍यक्‍त केला. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा कट उलथून लावण्‍यासाठी पोलिसांना बोलावण्‍यात आले.

काय आहे प्रकरण..
- एका झोपडीत सुमारे चार ते पाच फुट खोल खड्डा स्‍थानिकांना आढळला.
- खड्ड्यात एका बालकाला पुरुन त्याचा नरबळी देण्याचा प्रयत्‍न केला जात असल्‍याचा संशय लोकांना होता.
- पोलिसांना बोलावल्‍यानंतर खंड्ड्यात पुजेचे साहित्‍य आढळून आले.
- नरबळी दिला तर, सोने मिळेल असे एका मौलवीने सांगितल्‍याचे परिसरात बोलले जात आहे.
नरबळीचा प्रयत्‍न असल्‍याचे पोलिसांना अमान्‍य..
स्‍थानिकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी हा नरबळीचा प्रयत्‍न असल्‍याचे अमान्‍य केले आहे. या प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत. आतापर्यंत चौकशीसाठी एकाला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.