आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"प्रेरणा’ रोखणार नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांवर मानसोपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रेरणा प्रकल्प या नावाने शेतकरी मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम राबवण्याबाबतचा शासनादेश काढण्यात आला आहे.
विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, वाशीम, वर्धा आणि अकोला तर मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, लातूर, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि बीड अशा १४ जिल्ह्यांत "प्रेरणा प्रकल्प' राबवला जाईल.
मानसोपचार तज्ज्ञ नेमणार
गावोगावी अंगणवाडी सेविकेप्रमाणे आशा वर्कर नेमण्यात येईल. त्यांच्या मदतीने नैराश्यग्रस्त शेतकरी शोधून त्यांना जिल्हा रुग्णालयात मानसोपचार देण्यात येतील. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी तत्त्वावर मानसोपचार तज्ज्ञ नेमण्यात येतील.
कक्षातील पदे व वेतन
मानसोपचार तज्ज्ञ ७० हजार
चिकित्सालयीन तज्ज्ञ ४० हजार
मानसोपचार कार्यकर्ता ३० हजार
मनोविकृती परिचारिका २५ हजार
सामाजिक परिचारिका २५ हजार
रजिस्ट्री असिस्टंट १० हजार
एनजीओंचेच भले
एनजीओंच्या फायद्याची ही योजना आहे. डोक्याला जबरी मार बसला असताना गुडघ्यावर उपचार करण्याचा हा प्रकार आहे.
चंद्रकांत वानखेडे, शेतकरी नेते.
चक्करवार प्रवर्तक
यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार यांनीच मुख्यमंत्र्यांना ही योजना सूचवली होती. वेळीच उपचार झाले तर अडचणीतील शेतकऱ्यांना नैराश्येच्या गर्तेत जाण्यापासून व आत्महत्यांपासून रोखता येईल,’ असे डॉ. चक्करवार म्हणाले. यवतमाळमध्ये आम्ही हा पायलट प्रकल्प राबवून सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळल्याचे त्यांनी सांगितले.