आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामनाथ कोविंद यांचे मुंबईत जंगी स्वागत; उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/पणजी- राष्ट्रपतिपदासाठी भाजपप्रणीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आज (शनिवारी) मुंबईसह गोव्याच्या दौर्‍यावर आले. यावेळी त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. मुंबईत आले असतानाही त्यांनी मातोश्रीला जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट न घेता त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. याचवेळी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उद्धव यांच्याशी फोनवरून चर्चा केली. 
 
रामनाथ कोविंद हे  विमानतळावरुन थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये पोहोचले. तिथे ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आजच्या दौऱ्यात कोविंद एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गिते, रामदास आठवले, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाजप आणि घटकपक्षांचे नेते उपस्थित आहेत. सोबतच शिवसेनेचे आमदारही उपस्थित आहेत.

मातोश्रीवर जाणार नाहीत कोविंद...
रामनाथ कोविंद या दौऱ्यात ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नसल्याची माहिती मिळाली आहे.  यापूर्वी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असताना प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांनी ‘मातोश्री’वर हजेरी लावली होती, त्यांना शिवसेनेने पाठिंबाही दिला होता. पण आता कोविंद यांना पाठिंबा देऊनही ते शिवसेना पक्षनेतृत्वाची भेट टाळणार असल्याची माहिती आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांचे नाव घोषित केल्यानंतर एनडीएतील सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कोविंद राष्ट्रपतिपदाचा उमेदवारी अर्ज भरत असताना शिवसेनेचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी कोविंद “मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील असे वाटत होते. परंतु त्यांच्या दौऱ्यात ‘मातोश्री’ भेटीचा उल्लेख नाही.

काँग्रेसच्या काळात प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यावर शिवसेनेने पाठिंबाही दिला होता. इतकेच नव्हे तर मुखर्जी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती करावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली होती. 

अमित शहा गेल्याने कोविंद जाणे टाळणार  
रामनाथ कोविंद शनिवारी मुंबई विमानतळावरून थेट गरवारे क्लब येथे जाणार आहेत. तेथे ते भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटक पक्षांच्या सदस्यांशी चर्चा करतील. शिवसेनेचे प्रतिनिधीही या ठिकाणी कोविंद यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी कोविंद यांच्या उमेदवारीबाबत ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे आता कोविंद ‘मातोश्री’वर जाणार नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा.. गोव्यात रामनाथ कोविंद यांना 22 आमदारांचा पाठींबा..

हेही वाचा...
> राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांत फुटीची शक्यता, 6 अपक्ष आमदारांचे रामनाथ कोविंद यांना समर्थन
बातम्या आणखी आहेत...