आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Kickstarts Make In India Week In Mumbai

मोदींनी घेतले अमिर सोबत डिनर; शिवसेनेची मेक इन इंडियावर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिनरसाठी जाताना अमिर - Divya Marathi
डिनरसाठी जाताना अमिर
मुंबई - विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, या हेतूने वांद्रे कुर्ला संकुल येथे सुरू झालेल्या 'मेक इन इंडिया' सप्ताहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन झाले. दरम्‍यान, शनिवारी रात्री पंतप्रधानासोबत विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी डिनर घेतले. यामध्‍ये काही दिवसांपूर्वी असहिषणुतेच्‍या मुद्दयावरून वादात अडकलेला अभिनेता आमिर खान हासुद्धा सहभागी झाला. विशेष म्‍हणजे पंतप्रधान मोदी यांनी अमिर याची भेट घेतल्‍याचे वृत्‍त आहे. मात्र, शिवसेनेने शेतकरी आत्‍महत्‍येचा मुद्दा उपस्‍थित करत या कार्यक्रमाची थट्टा उडवली.

शिवसेनेने काय प्रश्‍न उपस्‍थ‍ित केले ?
शिवसेनेने या उपक्रमावर टीका करताना आपले मुखपत्र 'सामना'मध्‍ये म्‍हटले, यामुळे किती रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली? परदेश दौर्‍यांचा खर्च निघावा इतकीही गुंतवणूक आली नाही. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’त सहभागी होणारे 60 देश व पाच हजार प्रतिनिधी महाराष्ट्राला काय देऊन जाणार आहेत? हा प्रश्‍न आहेच. अर्थात, ‘मेक इन इंडिया’तून 12 लाख रोजगार अपेक्षित आहेत, दोन लाख कोटींचे करार होतील, असा अंदाज आहे. वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग, शिक्षण, आरोग्य, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक होईल, असे सांगितले जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस व उद्योगमंत्री देसाई याबाबत मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत. आम्ही त्यांच्या जिद्दीचे व मेहनतीचे कौतुक करतो. मुंबईबरोबर विदर्भ, मराठवाडासारख्या भागांतही विकासाचे चाक हलावे. कारण वर्षभरात फक्त विदर्भातच 1328 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यात एकाच महिन्यात 89 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही दुसरी बाजू ‘मेक इन इंडिया’चीच आहे व शेतकर्‍यांच्या आयुष्याला आधार देणारा ‘मेक इन महाराष्ट्र’ आपल्याला घडवायचा आहे. जैतापूरसारखे विध्वंसक, विषारी प्रकल्प भविष्यात हजारो शेतकर्‍यांचे रोजगार व आयुष्य उजाड करणार आहेत. पालघर तालुक्यातील परदेशी गुंतवणुकीतून उभी राहणारी वाढवणसारखी बंदरे लाखो मच्छीमारांचा रोजगार हिरावून घेणार आहेत व या विध्वंसक विकासाला जनतेचा विरोध असेल तर राज्यकर्त्यांनी शेतकरी, कष्टकर्‍यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या विकासाचा हट्ट करू नये. आम्ही स्वत: विकासाच्या व आधुनिक प्रगतीच्या बाजूचे आहोत. ‘मेक इन इंडिया’चे स्वागत महाराष्ट्रात करीत आहोत, पण विकासामुळे ज्यांच्या पोटावर मारले जाणार आहे त्यांचे शापही घेऊ नका! बाकी, पंतप्रधानांचे स्वप्न चिरायू होवो', असे शिवसेनेने म्‍हटले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, मोदी यांनी काय म्‍हटले ?