मुंबई- पंतप्रधान
नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी किमान 5 दिवस प्रचार करून, रोज तीन जाहीर सभा यानुसार ते राज्यात 15 सभा घेतील अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली आहे. 4 ऑक्टोबरला म्हणजेच आज मोदी बीड, औरंगाबाद आणि मुंबईत जाहीर सभा घेणार आहेत. तर, 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, गोंदिया, नाशिक येथे मोदी जाहीर सभा घेतील.
पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांचे 10 दिवस प्रचारसभेसाठी दिले आहेत. त्यानुसार मोदी 5 दिवस महाराष्ट्रात व 5 दिवस हरयाणात प्रचारसभा घेतील. प्रत्येक दिवशी 3 सभा या न्यायाने मोदी महाराष्ट्र व हरयाणात प्रत्येकी 15-15 सभा घेणार आहेत. याचबरोबर गरज पडली तर आणखी सभा घेणे शक्य आहे का याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे, असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. मात्र प्रचारासाठी आजपासून केवळ 10 दिवसच उरल्याने मोदींच्या 15-15 सभाच होणार हे जवळपास निश्चित आहे. सभा वाढवायच्या झाल्यास रोज चार-चार सभा घेण्याचे नियोजन केले जाऊ शकते.
पुढे वाचा, कोठे आणि किती वाजता मोदींच्या सभा आहेत शनिवारी..