आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात द्यायची ते मुंबईकरांनी ठरवावे- मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतील महालक्ष्मी येथे रेसकोर्सवर जाहीर सभा झाली. मोदी बीड आणि औरंगाबाद येथील सभा आटपून मुंबईत साडेआठ वाजता दाखल झाले. त्यानंतर ते थेट सभा स्थानी हजर झाले. यावेळी त्यांनी चौफेर विषयावर भाष्य केले.
खाली वाचा, मोदींनी मुंबईत काय भाष्य केले...
- मुंबई चालली तर तरच देशच चालतो
- 60 वर्षात खूप मोठी व्हिजन पाहिली, आता मला छोटं व्हिजन पूर्ण करायचे आहे.
- 60 वर्षात काहीही न करणारे माझ्या 60 दिवसाचे हिशोब मागताहेत
- आघाडी सरकारच्या काळात कौन बनेगा अरबपती हा खेळ सुरू होता
- 2022 पर्यंत प्रत्येकाला घर असेल
- मुंबईचे विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार
- मुंबईत देशातील सर्वोत्तम मेट्रो लाईन व रेल्वे जाळे उभारणार
- कौशल्य विकासासाठी प्रथमच केंद्रात मंत्रालयाची स्थापना
- 15 वर्षात महाराष्ट्राला काय मिळाले?
- जातपात, प्रांतवादाचे तंटे आता खूप झाले
- देशाच्या तरूण पिढीला विकास हवा आहे
- मुंबईचा विकास थांबला तर देशाचा विकास थांबतो
- महाराष्ट्र मागे राहिल्यास देश मागे राहतो
- उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त दंगली महाराष्ट्रात
- कृषीमंत्र्यांच्या राज्यातच सर्वात जास्त आत्महत्या
- काँग्रेस नेत्यांत मोदींवर सर्वात जास्त कोण टीका करते यावरून स्पर्धा
- लोकसभेतील निवडणुकीतून ते काहीच शिकले नाहीत
- लोकसभा निवडणुकीपूर्वी चार महिने माझ्याविरोधात बोलले जात होते
- देशाच्या जनतेने मात्र सर्वांना मतदानाच्या रूपाने जोरदार धक्का दिला आहे.
- मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही
- भाजपला पूर्ण बहुमत द्या. अर्धवट द्याल तर मागील 15 वर्षात जे भोगलं तेच पुढे सुरु राहील
- मुंबईत भाजपचा जन्म झाला आहे. कमी काळात भाजपचा मोठा विस्तार झाला
.............
नितीन गडकरींनी आपल्या भाषणात भाजप विकासावर आधारित राजकारण करणार असल्याचे सांगितले. यावेळी गडकरींनी पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, मधुकर पिचड यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एका पार्टीची प्रायवेट प्रॉपर्टी नाही. छत्रपती हे सर्वांचे, रयतेचे राजे होते. शिवजयंती साजरी करताना आम्ही कोणाकडून खंडणी गोळा करीत नाही. तसेच आम्ही जगाला ओरडून सांगत नाही, अशी टीका शिवसेनेवर केली. छत्रपतींचे नाव घेतले पोटात का दुखते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपचे सरकार आल्यास मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल असा अपप्रचार केला जात आहे तो चुकीचा आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.