आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain\'s Royal Couple Prince William And Kate Land In Mumbai

ब्रिटनचे राजकुमार विलियम पत्‍नीसोबत मुंबईत पोहोचले, या चार गोष्‍टींबद्दल आहे उत्‍सुकता...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ब्रिटेनचे राजकुमार विलियम आणि त्‍यांची पत्‍नी केट मिडलटन हे रविवारी पहिल्‍यांदाच भारत दौऱ्यात येणार आहेत. त्‍यांचा हा दौरा सात दिवसांचा राहणार असून, दोन्‍ही देशांतील संबंध मजबूत करण्‍यासाठी त्‍यांची ही भेट महत्‍त्‍वाची ठरेल, असा आशावाद ब्रिटिश उच्‍चायुक्‍त (बीएचसी) सर डोमिनिक एस्क्विथ यांनी व्‍यक्‍त केला.
या चार गोष्‍टींबद्दल उत्‍सुकता...
- ब्रिटिश उच्‍चायुक्‍त सर डोमिनिक एस्क्विथ यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 'भारतातील क्रिकेट, बॉलीवुड, राजकारण आणि फॅमिली पॅशनबाबत ब्रिटिशच्‍या या शाही कुटुंबाला खूप उत्‍सुकता आहे. त्‍या बद्दल ते जाणून घेणार आहेत.'
- विलियम-केट ताज महललाही भेट देणार आहेत. यापूर्वी 24 वर्षांपूर्वी (1992) प्रिंसेस डायना या ताज पाहायला आल्‍या होत्‍या.
असा राहील दौरा?
1) 10 अप्रैल- राजकुमार विलियम आणि त्‍यांच्‍या पत्‍नी केट मिडलटन मुंबईत येणार.
- येथे ताज पॅलेस हॉटलमध्‍ये मुक्‍काम आणि 26/11 दहशतवादी हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍यांना श्रद्धांजली.
- ओव्‍हल ग्राउंडवर एक चॅरिटी क्रिकेट मॅच पाहणार आणि झोपटीपट्टी भागात राहणाऱ्या मुलांची भेट घेणार.
- बाणगंगा वॉटर टँक परिसरात जावून सामान्‍य नागरिकांची भेट घेणार.
- रात्री बॉलीवुडच्‍या कलाकारांसोबत डिनर.
- 11 एप्रिलला मुबईतील यंग आंत्रप्रेन्योर्सच्‍या एका कार्यक्रमात भाग.
2) 11 एप्रिल- दिल्लीला जाणार
- इंडिया गेट समोर शहिदांना श्रद्धांजली वाहतील.
- महात्मा गांधी यांच्‍या समाधीस्‍थळाचे दर्शन घेतील.
- ज्‍या ठिकाणी गांधीजींना गोळ्या घातल्‍या होत्‍या तिथेही ते भेट देतील.
- ब्रिटिश हायकमिश्नरच्‍या रेसिडेंसवर आयोजित महाराणीच्‍या वाढदिवसाच्‍या कार्यक्रमात भाग घेतील.
3) 12 एप्रिल- दिल्लीमध्‍ये रॉयल कपलने दोन कार्यक्रमांची घोषणा केली.
4) 12 एप्र‍िल- असामच्‍या काजीरंगा नॅशनल पार्कला भेट.
5) 14 एप्रिल- भूटानची राजधानी थिम्पूला जाणार.
6) 15 एप्रिल- थिम्पूमध्‍ये टाइगर नेस्ट मोनेस्ट्रीत जाणार. यासाठी सहा तास लागतात.
- ब्रिटिश नागरिकांकडून देण्‍यात येणारे रिसेप्शन अटेंड करणार.
7) 16 एप्रिल आग्रा येथील ताज महलला भेटे देणार.
पुढील स्‍लाइडवर पाहा, रॉयल कपलचे फोटोज...