आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prison Not Follow Laws For Sanjay Dutta, Said Inquary Committee

तुरुंगाच्या नियमांना संजय दत्तचा फाटा; चौकशीत ठपका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेकायदाशस्त्रे बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त फर्लोची मुदत संपल्यानंतरही दोन दिवस तुरुंगाबाहेर राहिल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
डिसेंबरमध्ये संजय १४ दिवसांच्या फर्लोवर घरी परतला होता. जानेवारी रोजी तो तुरुंगात परतणे अपेक्षित असूनही फर्लोला मुदतवाढ मागितल्याचे निमित्त करून दोन दिवसांनी तुरुंगात पोहोचला होता.
संजयला वारंवार सुट्या देऊन सोडले जात असल्याची ओरड झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी चौकशी अहवाल सादर केला असून त्यात संजय दोन दिवस बेकायदेशीररीत्या तुरुंगाबाहेर राहिल्याचे म्हटले. फर्लोची मुदत संपल्यानंतर जास्तीचा एक दिवस बाहेर राहणा-या कैद्याच्या फर्लोतील दिवस कपात केली जाते. संजय दोन दिवस बाहेर राहिल्याने त्याच्या उर्वरित फर्लोतील १० दिवसांची फर्लो कपात केली जाईल.या प्रकरणात मुंबई पोलिस आणि तुरूंग प्रशासनात समन्वयाचा अभाव होता असा ठपकाही बोरवणकर यांनी ठेवला आहे.

पुढे वाचा, नियमांचा भंग करून संजय दत्त दोन दिवस तुरूंगाबाहेर राहिला