आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैद्यांना मिळणार काैशल्य पदवी, बंदिवानांमधील उद्याेजकता विकसित करण्यासाठीचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गुन्हेगाराची चूक कितीही अक्षम्य असली तरी स्वत:ला सुधारण्याची संधी िमळाली पाहिजे, असे कायदा मानताे. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या विविध कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या अनेक बंदिवानांमधील उद्याेजकता विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात अाहेत. कारागृहातून शिक्षा भाेगून कैदी वाल्याचा वाल्मीकी  हाेऊन बाहेर पडला तरी समाज त्यांना स्वीकारत नाही. परिणामी अंगी अनेक काैशल्य असतानाही तुरुंगातून सुटल्यावर त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध हाेऊ शकत नाही, पण अाता राज्य सरकारच्या काैशल्य विकास याेजनेच्या माध्यमातून या कैद्यांना थेट काैशल्य प्रमाणपत्रच िमळणार अाहे. त्यामुळे  राेजगाराच्या नव्या संधी उपलब्ध हाेणार अाहेत.   

सश्रम कारावासाची शिक्षा भाेगत असलेल्या कैद्यांना  विविध प्रकारच्या बारा उद्याेग काैशल्यांचे िशक्षण देण्यात येते. तुरुंगवासाची िशक्षा संपून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांना राेजगार मिळवताना अडचणी येतात,  परंतु अाता प्रमाेद महाजन काैशल्य विकास याेजनेंतर्गत या कैद्यांना काैशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार अाहे. हे प्रमाणपत्रच त्याची व्यावसायिक अाेळख असेल. त्यामुळे िशक्षा संपवून बाहेर पडल्यावर  राेजगार िमळणे सुलभ हाेऊन त्यांचे अाणि पर्यायाने कुटुंबाचे पुनर्वसन हाेण्यास मदत हाेईल, असे कारागृह उद्याेग विभागाचे महासंचालक प्रशांत मत्ते यांनी  सांिगतले.  
 
राज्यातल्या कारागृहात अाठ हजार कैदी असून त्यापैकी सहा हजार कैद्यांना उद्याेग प्रशिक्षणाच्या माध्यमातून राेजगार पुरवला जात अाहे. सध्या हे प्रशिक्षण सश्रम कारावासाची िशक्षा भाेगत असलेल्या कैद्यांनाच िदले जात असले तरी अन्य  कैद्यांनी इच्छा व्यक्त केल्यास त्यांनाही हे प्रशिक्षण देण्यात येईल, असे मत्ते म्हणाले. व्यावसायिक अाेळख असल्याचे प्रमाणपत्र िमळाल्यानंतर समाजाचा या कैद्यांकडे बघण्याचा दृष्टिकाेन बदलेल.  त्याचबराेबर उद्याेगांनी देखील त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
   
काैशल्यातून राेजगार   
कारागृहातील कारखाना विभागामध्ये  सुतारकाम, शिवणकाम, धोबीकाम, यंत्रमाग, बेकरी, फरसाण बनवणे, रसायन, चामड्यांच्या वस्तू तयार करण्यात येतात. अनेक कौशल्यपूर्ण कामांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच कुशल, अर्धकुशल कैदी हे उत्पादन तयार करतात. कारागृहाबाहेर असलेल्या शोरूममध्ये त्याची विक्री होते. यामध्ये कारागृहाच्या आवारात करण्यात येणाऱ्या शेतीतूनही चांगले उत्पन्न िमळते. 
 
बातम्या आणखी आहेत...