आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pritam Munde News In Marathi, Beed Lok Sabha Constituncy, Divya Marathi

बीडमध्ये लोकसभेसाठी भाजपकडून प्रीतम मुंडे?, परळीसह इतर भागात दौरे वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभेसोबतच बीड लोकसभा मतदारसंघातही निवडणूक होत असून, या ठिकाणी भाजपकडून कोणाला उमेदवारी द्यायची याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे येथून लढण्याची शक्यता वर्तवली जात होती. तथापि, पंकजा यांनी राज्यात राहण्याचा निर्णय घेतल्याने आता त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्याचे घाटत आहे.
विधानसभेसोबतच म्हणजे १५ आॅक्टोबर रोजीच बीडमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या जागेसाठी मुंडे यांच्या दुसऱ्या कन्या प्रीतम यांच्या नावाची चर्चा आहे. त्या नाशिक येथे राहतात. परंतु अलीकडे त्यांनी परळी, बीड परिसरात चकरा सुरू केल्या आहेत. मुंडे कुटुंबातील कोणी निवडणूक लढवणार असेल तर राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे मुंडे कुटुंबातूनच कोणी तरी निवडणूक लढवावी, अशी रणनीती आखली जात आहे.