आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithiviraj Chavan News In Marathi, Chief Minister, E governance, Divya Marathi

संकेतस्थळे तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार,पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रशासनाच्या कामकाजात सुव्यवस्था आणि पारदर्शकता निर्माण होण्यासाठी व प्रशासकीय माहिती जनतेसाठी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक विभागांची संकेतस्थळे तयार करण्यात आली आहेत. या संकेतस्थळांवरील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ‘ई-प्रशासन’ पुरस्कार वितरण सोहळा-2013 आणि नवीन माहिती-तंत्रज्ञान प्रकल्पाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी सह्याद्री अतिथिगृह येथे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. एका विशेष पुरस्कारासह सहा वेगवेगळ्या प्रवर्गांतील एकूण 17 पारितोषिकांचे वितरण या वेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे संचालक वीरेंद्र सिंह, एनआयसीचे मोईन हुसेन, ‘महाआॅनलाइन’चे सतनाम सेठी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असून, शासकीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. तसेच ई-दहशतवाद व सायबर सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ‘ई-प्रशासन’मुळे प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता येऊन कार्यक्षमता वाढण्यासह वेळ आणि मनुष्यबळाची बचत होते. ‘ई-चावडी’, ‘ई-सातबारा’, ‘ई-मोजणी’, ‘ई-टेंडरिंग’ आदी उपक्रमांमुळे राज्याच्या महसुलात वाढ होत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना प्रशासकीय सुविधा सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आता शासनातर्फे तयार होणारी ‘ई-बुक’ व ‘ऑडिओ बुक’ सुविधा मोफत पुरवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. माहिती-तंत्रज्ञानाच्या नवीन
प्रकल्पांसह ‘स्टेट डेटा बँक’ उपक्रमाचे अनावरण याप्रसंगी चव्हाण यांनी केले.

* वेगवेगळ्या प्रवर्गांतील एकूण 17 पारितोषिकांचे वितरण
‘महान्यूज’ वेब पोर्टलला सुवर्ण
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महान्यूज’ या वेब पोर्टलला ‘उत्कृष्ट वेबसाइट/पोर्टल’ या प्रवर्गातील सुवर्ण पारितोषिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर, सचिव व विशेष चौकशी अधिकारी प्रमोद नलावडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रल्हाद जाधव उपस्थित होते.

राज्य ‘ई-प्रशासन’ पुरस्कारांचे वितरण
०विशेष पुरस्कार (प्लॅटिनम), प्रकल्प- घराघरात विश्वकोश, विभाग- मराठी विश्वकोश निर्मिर्ती मंडळ.
०‘सर्वोत्कृष्ट ई-प्रशासन’ (सुवर्ण), प्रकल्प- आय-सरिता, विभाग- नोंदणी व मुद्रांक शुल्क.
०‘सर्वोत्कृष्ट ई-प्रशासन’ (रजत), प्रकल्प- कोलीस, विभाग- कोल्हापूर जिल्हा.
०‘सर्वोत्कृष्ट ई-प्रशासन’ (कांस्य), प्रकल्प- एसएडीएम, विभाग- सार्वजनिक आरोग्य.
०‘ई-प्रशासन’च्या साह्याने कार्यपद्धतीत उत्कृष्ट बदल (सुवर्ण), प्रकल्प- एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली, विभाग- लेखा व कोषागरे संचालनालय.
०‘ई-प्रशासन’च्या साह्याने कार्यपद्धतीत उत्कृष्ट बदल (रजत), प्रकल्प- प्रोजेक्ट परिवर्तन-ईआरपी-एसएपी-इम्प्लिमेंटेशन फॉर बिझनेस इन एमएसईटीसीएल, विभाग- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी.
०‘ई-प्रशासन’च्या साह्याने नागरी केंद्रांमध्ये सुविधांचे उत्कृष्ट प्रदान (सुवर्ण), प्रकल्प- एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली, विभाग- म्हाडा.
०‘ई-प्रशासन’च्या साह्याने नागरी केंद्रांमध्ये सुविधांचे उत्कृष्ट प्रदान (रजत), प्रकल्प- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, विभाग- राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना.
०‘ई-प्रशासन’च्या साह्याने नागरी केंद्रांमध्ये सुविधांचे उत्कृष्ट प्रदान (कांस्य), प्रकल्प- संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम), विभाग- पंचायतराज व ग्रामविकास.
०‘उत्कृष्ट वेबसाइट/पोर्टल’ (सुवर्ण), प्रकल्प- महान्यूज वेब पोर्टल, विभाग- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
०‘उत्कृष्ट वेबसाइट/पोर्टल’ (रजत), प्रकल्प- मराठी भाषा विभागाचे संकेतस्थळ, विभाग- मराठी भाषा विभाग.