आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभा निवडणुकीची तयारी: पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत घेणार खासदारांची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 19 ऑगस्ट रोजी राज्यातील खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत घेणार आहेत.


राज्यात काँग्रेसची ताकद वाढवून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. राष्ट्रवादीपेक्षा जास्त खासदार निवडून आणून दिल्लीतील शरद पवारांची ताकद कमी करण्याची योजना काँग्रेसने आखली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या खासदारांबरोबर एका बैठकीचे आयोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत होणार्‍या या बैठकीला राज्यातील काँग्रेसचे खासदार आपल्या मतदारसंघातील समस्या मांडणार तसेच निवडणूक तयारीची माहिती सादर करणार आहेत. खासदारांच्या समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याबाबतही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

खासदारांच्या मतदारसंघातील कामे, कार्यकर्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून मतदारांत चांगला संदेश कसा पोहोचवता येईल, याबाबत विचार केला जाणार आहे. राष्ट्रवादीबरोबर युती करून आगामी निवडणुका काँग्रेस लढवणार आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीच काँग्रेसचे उमेदवार पडण्याची शक्यता असल्याने काय करता येईल, याचा विचारही केला जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.