आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan Alleged That Opposition Is Creating E Terrorism

विरोधकांचा ई-दहशतवाद: पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, अफवेसाठी फेसबूकचा वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशात 1991 ची परिस्थिती निर्माण करण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत. त्यावेळी विरोधकांनी जातीय हिंसाचार, जातीय तेढ निर्माण करून देशात असुरक्षिततेचे वातावरण तयार केले होते. आताही तसाच डाव असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावध राहून हा कट हाणून पाडला पाहिजे. विरोधक सोशल मीडियाचा वापर करून इलेक्ट्रानिक दहशतवाद पसरवत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी मुंबई येथे आयोजित काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रवक्ता शिबिरात केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारा आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रवक्ता शिबिराचा समारोप शनिवारी झाला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य शकील अहमद, काँग्रेसचे राष्ट्रीय चिटणीस अनिस अहमद, कामगार कल्याण राज्यमंत्री राजेंद्र गावित आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनी म्हणाले, सोशल मीडियाचा गैरवापर करून विरोधकांनी निखालस खोटा आणि जनतेच्या भावनांशी खेळण्याचा मार्ग स्वीकारला आहे. विरोधकांनी ई-दहशतवाद सुरू केला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही सोशल मीडियाचा वापर वाढवून विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. देशात पुन्हा एकदा काँग्रेसच विजयी होणार असून, त्यामध्ये पक्षाच्या प्रवक्त्यांची जबाबदारी मोठी असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री राजीव शुक्ला यांनी शिबिरातील पदाधिका-यांना उत्तम प्रवक्ते होण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शकील अहमद आणि अनिस अहमद यांनीही या वेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.