आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prithviraj Chavan Ask About Vilasrao Health Information

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांकडून विलासरावांच्या प्रकृतीची विचारपूस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विलासरावांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे कळताच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे चेन्नईला गेल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासरावांचे पूत्र व आमदार अमित देशमुख यांच्याकडे प्रकृतीविषयी विचारपूस केली. आपण चेन्नईला जाण्याच्या तयारीत होतो, परंतु कोणालाही भेटू दिले जात नसल्याचे विलासरावांच्या कुटुंबीयांकडून कळाले. त्यामुळे बेत रद्द केला, असे चव्हाण म्हणाले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले की, दोन-तीन दिवसांनंतर डॉक्टर विलासरावांवरील शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेणार असल्याचे अमित म्हणाले. त्यांनीच आम्हाला चेन्नईला न येण्याचे सुचवले. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार व आपण स्वत: चेन्नईला गेलो नाहीत, असे तावडे यांनी सांगितले.