आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan Credits Pawar For Cong NCP's 'Cohesive' Campaign News In Divya Marathi

मुख्यमंत्री चव्हाणांकडून शरद पवारांवर स्तुतिसुमने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत असून, आघाडीतील या एकीचे सर्व श्रेय शरद पवार यांनाच जाते,’ अशी स्तुतिसुमने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उधळली. तसेच राज्यात गेल्या वेळपेक्षा आघाडीचे जास्त खासदार निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला.

‘स्थानिक निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही काँग्रेस एकमेकांविरोधात लढल्या. मात्र महायुतीविरोधात लढायचे असेल तर दोन्ही काँग्रेसला एकत्रित येऊनच काम करावे लागेल, याची आम्हाला आता खात्री पटली आहे,’ असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत दिले. ‘यंदाच्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेस पक्ष एकसंघ होऊन राजकीय लढा देत आहे. राज्यातील तीन-चार मतदारसंघांत काही ठिकाणी किरकोळ मतभेद आहेत, मात्र त्याचा फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या मतदारसंघात एकत्रित दौरे करून संयुक्त सभाही घेत आहेत. सोनिया गांधींच्या उपस्थितीत झालेल्या सभांना शरद पवारांचीही उपस्थिती होती, तसेच पवारांसोबत मीही राज्यात अनेक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे संघटन लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

महायुती, आपचेही आव्हान
‘राज्यात गेल्या वेळेपेक्षा निश्चित आघाडीच्या जास्त जागा निवडून येतील. आमच्यासमोर महायुतीबरोबरच आम आदमी पक्षाचेही आव्हान असेल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.