आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan Is Congress Mastermind In Maharashtra Assembly Election 2014

‘मिस्टर क्लीन’ पृथ्वीराज चव्हाणच आहेत हुकमी एक्का, काँग्रेसने केली व्यूहरचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीत दणकून आपटल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली रणनीती तयार केली आहे. पराभवातून धडा घेत ही रणनीती तयार करण्यात आली आहे. लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाची स्पष्ट लक्षणे दिसत असल्याने आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वच नेत्यांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ २ जागांवरच विजय मिळवू शकल्यानंतर राज्यातील काँग्रेस खडबडून जागी झाली. हवेत असलेल्या अनेक नेत्यांची झोप उडाली. यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर या पराभवाचे खापर फोडून त्यांच्या हकालपट्टीचे प्रयत्न झाले. पक्षश्रेष्ठींनी चव्हाणांना हटवायला नकार दिल्यानंतर मात्र हे वादळ शमले.

गटबाजी संपवण्याचे प्रयत्न
काँग्रेसच्या रणनीतीतील पहिला भाग म्हणजे निवडणुकीत एका नेत्याचा चेहरा लोकांसमोर ठेवणे. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांचा चेहरा लोकांसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत होण्यास भ्रष्टाचाराचा मुद्दाही कारणीभूत ठरला. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्याद्वारे जनतेला आकर्षित करण्याची खेळी काँग्रेसने खेळली आहे. रणनीतीचा दुसरा भाग म्हणून काँग्रेसमधील गटबाजीस चाप लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक प्रमुख नेत्यावर काही तरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नारायण राणे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या सर्वांवर जबाबदा-या सोपवण्यात आल्याने सर्वच नेते कामाला लागले आहेत.

महत्त्वाकांक्षेला घातला पायबंद
पृथ्वीराज चव्हाण यांना काढून मलाच मुख्यमंत्री करा म्हणणा-या नारायण राणे यांच्या महत्त्वाकांक्षेला हायकमांडकडूनच वेसण.

मराठवाड्यातील यशाची बक्षिसी
लोकसभेत यशाचा दुष्काळ असतानाही अशोक चव्हाण यांनी दोन जागा जिंकवून दिल्याने निवडणुकीत मोठी जबाबदारी.
ताब्यातील जागांवर लक्ष
राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबद्दल जनतेच्या मनात संताप असल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय हासुद्धा रणनीतीचाच एक भाग. यामुळे अ‍ॅन्टी इन्कम्बन्सीचा बसणारा फटकाही कमी होऊ शकतो. कारण काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे फार गंभीर आरोप नाहीत. विजयी ८२ पैकी ५५ जागांवर तर त्यांना ४० ते ५० टक्के वा त्यापेक्षाही अधिक मतेही प्राप्त झाली होती. त्यामुळे या जागांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय विजयी झालेल्या उर्वरित १७ जागा आणि दुस-या क्रमांकावरील ६१ जागांवर सर्वाधिक ताकद लावली जात आहे. राष्ट्रवादीने गेल्या वेळेस हरलेल्या आणि तो पक्ष दुस-या व तिस-या क्रमांकावर असलेल्या ४८ जागांवरही काँग्रेसने विजयाचे प्रयत्न चालवले आहेत.