आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan News In Marathi, Chief Minister, Lotus Building, Divya Marathi

उंच इमारतींच्या सुरक्षेचा आढावा घ्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंधेरी येथील लोटस इमारतीला आग लागल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील उंच इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्वरित अग्निशमन यंत्रणांशी संपर्क साधून मुंबईतील उंच इमारतींच्या आग प्रतिबंधक योजनेबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून उंच इमारतींचे प्रमाण वाढत चालले आहे. यात व्यावसायिक आणि निवासी इमारतींचा समावेश आहे. सुमारे 50 ते 60 मजल्यांच्या इमारती उभारल्या जात असल्याने संकटसमयी शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचेल अशी शिडी अग्निशमन दलाकडे नाही. त्यामुळे अशा इमारतींना आग लागल्यास ती विझविणे कठीण होते. महाराष्ट्र अग्निशमन विभागाचे संचालक मिलिंद देशमुख यांनी लोटस आगीबाबत बोलताना सांगितले, मुंबईतील अनेक इमारतींचे फायर ऑडिट झालेले नाही. उंच इमारतींना परवानगी देण्यापूर्वी संबंधित विभागातील अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी आणि मनपाच्या अधिका-यांनी फायर ऑडिट करणे आवश्यक असते, परंतु ते केले जात नाही. लोटस इमारतीने अग्निप्रतिबंधक योजना केल्या होत्या का व याबाबतच्या नियमांचे पालन केले होते का याचा अभ्यास केला जाईल आणि त्यानंतरच याबाबत सविस्तर माहिती देता येईल. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिका-याने सांगितले, मुख्यमंत्र्यांनी नौदलाकडेही मदतीसाठी शब्द टाकला. नौदलामुळेच तेथे अडकलेल्या अग्निशमन दलातील अधिका-यांना सुरक्षित काढता आले.