आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prithviraj Chavan News In Marathi, Chief Minister,Divya Marathi, Congress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री बदलण्याचा सोमवारी होणार फैसला; चव्हाण, ठाकरेंच्या उचलबांगडीचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात नेतृत्व बदलाचे जोरदार वारे आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भवितव्याचा फैसला सोमवारी होणार आहे. आसाम, हरियाणा आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बदलण्याचे संकेत काँग्रेस श्रेष्ठींकडून मिळत आहेत. राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे.

नेतृत्व बदलात दुस-या एका पर्यायावर विचार सुरू असून राज्य मंत्रिमंडळातील एखाद्या सदस्यालाच संधी दिली जाऊ शकते. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांची मुकुल वासनिक यांच्यासोबत झालेल्या गुप्त बैठकीची यामुळे सध्या जोरदार चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यात पाठवण्यापूर्वी वासनिक यांनाही विचारणा करण्यात आली होती. मात्र तेव्हा त्यांनी नकार दिला होता.
स्वतंत्र विदर्भाची मागणी होत असताना आणि मराठा आरक्षणाचा निर्णय घेत असताना विदर्भातील दलित व्यक्तीला देऊन एका दगडात दोन पक्षी मारण्याची चाचपणी काँग्रेस श्रेष्ठी करीत असल्याचे दिसते.

पुढील स्लाईडवर वाचा सुशीलकुमार शिंदे भारतात परतले...