आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prithviraj Chavan Not Celebrate Brthday News In Marathi

वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात गारपिटीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचे भान राखत या वर्षी वाढदिवस (दि. 17 मार्च) साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. समर्थक, हितचिंतकांनी सोमवारी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर्स, जाहिराती, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता ती रक्कम गारपीटग्रस्तांची मदत करण्यात खर्च करावी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गेली दोन वर्षे राज्यात सलग भीषण दुष्काळाचे संकट होते. यातून शेतकरी सावरतो न सावरतो, तोच गारपिटीने त्याला उद्ध्वस्त केले आहे. राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेता वाढदिवस साजरा करणे औचित्याला धरून होणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असून हितचिंतकांनी गारपीटग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढे यावे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.