आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Prithviraj Chavan Resigned From Chief Ministership, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाच्या राजकीय इतिहासात प्रथमच मावळत्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, राष्ट्रपती राजवट शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर सत्तेतील सरकारच अल्पमतात येण्याची आणि त्यामुळे मावळत्या मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा देण्याची घटना देशाच्या राजकीय इतिहासात शुक्रवारी बहुधा पहिल्यांदाच घडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला असून त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्यानंतर आघाडी सरकारचाही पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेऊन ४५ मिनिटे चर्चा केली. तांत्रिकदृष्ट्या आपण पदावर राहू शकत नसल्याचे लक्षात आल्याने संध्याकाळी त्यांनी राजीनामा सुपूर्द दिला.
आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा दावा करत हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लाग करा, अशी मागणी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राज्यपालांकडे केली. याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून प्रक्रियाही सुरू केली सुरुवात असल्याचे राज्यपालांनी सांगितल्याचा खडसेंचा दावा आहे.

राज्यपालांच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रक्रियेला साधारण दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. सध्या पंतप्रधान देशाबाहेर असल्याने कदाचित या प्रक्रियेला अधिक काळ लागू शकण्याची शक्यता आहे.

१९८० नंतर दुसरी वेळ
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. त्यामुळे १९८० नंतर दुस-यांदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. १९८० मध्ये शरद पवार यांचे पुलोद सरकार बहुमतात असूनही पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू केली होती.

राज्यपालांसमोर दोन पर्याय
मावळते सरकारच अल्पमतात येण्याची ही पहिलीच घटना आहे. अल्पमतामुळे राजीनामा देण्याची मुख्यमंत्र्यांची कृती ही राज्यघटनेनुसार योग्यच आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांसमोर दोन पर्याय आहेत. त्यापैकी एक- निवडणुका होऊन नवे सरकार सत्तारूढ होईपर्यंत विद्यमान मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगणे. आणि दुसरा- मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर करून राष्ट्रपती राजवट लागू करणे, असे कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी सांगितले.
ऐतिहासिक घटनात्मक पेच
निवडणुका जाहीर झाल्यावर सरकारचा पाठिंबा काढणारे लोक भविष्यात जन्माला येतील, याची कल्पना राज्यघटनाकारांनाही आली नाही. अशा वेळी काय करायला हवे, याबद्दल राज्यघटनेत कोणताच उल्लेख नाही. त्यामुळे ऐतिहासिक घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसद्वेषामुळेच राष्ट्रवादीने पाठिंबा काढला,असे काँग्रेसचे रत्नाकर महाजन म्हणाले.

... तर भाजपचे आयते नियंत्रण
राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यात केंद्र सरकारचीच सत्ता असते. यामुळे ऑक्टोबरमध्ये सत्तांतर होऊन आपल्याच हाती सत्ता येईल या आशेवर असलेल्या भाजपला निवडणुकीपुर्वीच राज्याच्या प्रशासनावर अप्रत्यक्षपणे नियंत्रण मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांवर एक प्रकारे दबावही राहू शकतो.
फाटाफुटीनंतरचे सर्वेक्षण सांगते...
पंचवीस वर्षांची शिवसेना- भाजप युती आणि पंधरा वर्षांची काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणाची समीकरणेच बदलून गेली. या फाटाफुटीचा सर्वाधिक फटका भाजप आणि काँग्रेसलाच बसेल असा एबीपी माझा- निल्सनच्या सर्वेक्षणाचा अंदाज आहे. मुंबईच्या विविध भागातील विविध वयोगटातील ७०० लोकांचे हे सर्वेक्षण आहे. त्याचे ठळक निष्कर्ष पाहा पुढे....