आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारियाप्रकरणी काँग्रेस फडणवीसांना घेरणार, पृथ्वीराज चव्हाणांचेही हात वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्या फरार असलेले आयपीएलचे माजी प्रमुख ललित माेदी यांना लंडनमध्ये भेटल्याचा मोठा फटका ज्याप्रमाणे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना बसण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे राज्यातील फडणवीस सरकारही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. ललित यांना भेटल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे या भाजप नेत्या वादात अडकल्या आहेत. आगामी संसद अधिवेशनात काँग्रेस याबाबत नरेंद्र माेदी सरकारला जाब विचारणार आहे, त्याचप्रमाणे राज्यातही मारियाप्रकरणी फडणवीस सरकारला घेरण्याची काँग्रेसने चालवली आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये होणार आहे. यात मारिया - ललित मोदी भेटीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेस हा मुद्दा लावून धरू शकते. दुसरीकडे, सप्टेंबरमध्ये मारिया यांची राज्याच्या पाेलिस महासंचालकपदी (डीजीपी) बढती होणार होती. मात्र, या प्रकरणानंतर ही बढती रोखली जाण्याची शक्यता आहे. मारिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे मानले जातात. तसेच विद्यमान पोलिस महासंचालक संजीव दयाळ तसेच महासंचालक (पोलिस गृहनिर्माण) अरूप पटनायक या दोघांचाही मारियांच्या नावाला मोठा िवरोध आहे. या कारणामुळेही त्यांची संधी हुकू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच विराेधकांच्या टीकेपासून बचाव करण्यासाठी फडणवीस सरकार मारियांवर कारवाईही करू शकते, अशी माहिती पुढे येत आहे.

‘आपण ललित मोदींना भेटलो होतो, त्याची सरकारला माहितीही दिली हाेती,’ असा आधीच खुलासा करून पुढे होणार्‍या वादाची धग कमी करण्याचा प्रयत्न मारिया यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या भेटीबाबत काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केल्याने मारिया अडचणीत आले आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवल्याने मारियांचा पुढचा प्रवास काहीसा कठीण झाला आहे.

प्रोटोकाॅल माेडला
ललितमोदी हे फरार आहेत, हे माहिती असूनही मारिया हे त्यांना भेटत असतील तर ते साफ चुकीचे ठरते. अंडरवर्ल्डकडून मोदींना धमक्या येत होत्या आणि त्यासाठीची आपली ही भेट होती, असे मारिया म्हणत असले तरी ते त्यांच्या वकिलांना भेटू शकले असते. थेट त्यांना भेटण्याची काय गरज होती? तसेच ही भेट होऊन मुंबईत परतल्यानंतर मारियांनी राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव यांची भेट घेता थेट गृहमंत्र्यांची भेट घेऊन प्रोटोकाॅल पाळलेला नाही, असे पोलिस सूत्रांनी सांिगतले.

राष्ट्रवादीशी जवळीक
पृथ्वीराजचव्हाण मुख्यमंत्री असताना मारियांची पोलिस आयुक्तपदी िनयुक्ती झाली होती. पण या िनवडीला खुद्द चव्हाण काँग्रेस राजी नव्हती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहापुढे त्यांचा नाइलाज हाेता, अशीही चर्चा आहे. काँग्रेसकडून जावेद अहमद यांची या पदासाठी िशफारस करण्यात आली होती. पण भले सरकार पडले तरी चालेल, मात्र मारियाच पाहिजे, असा हट्ट पवारांनी धरल्यामुळे चव्हाणांना नमते घ्यावे लागले. त्याच वेळी मारियांनी सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेलांशीही संधान साधल्याची चर्चा होती.