आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरी अपघाताचे संसदेत पडसाद; मुंबई-गोवा मार्गाचे चौपदरीकरण होणार आहे का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ दिल्ली- मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे मंगळवारी पहाटे झालेल्या खासगी बसला अपघाताचे पडसाद विधानसभेसह संसदेत‍ही उमटले. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.

मुंबई-गोवा महामार्गावर शेकडो अपघातांत अनेकांचे बळी गेले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे का? चौपदरी करणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असताना एक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. महामार्गावर अपघात होत आहेत, याकडे खा. अनंत गिते यांनी लक्ष वेधले.

दरम्‍यान, रत्नागिरीचे पालकमंत्री भास्‍कर जाधव यांनी अपघात स्‍थळाला भेट दिली. त्‍यांनी अपघातग्रस्‍त बस आणि परिसराची पाहणी केली. त्‍यानंतर त्‍यांनी जखमींचीही भेट घेऊन विचारपूस केली. जखमींना मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी प्रत्‍येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर मृतकांच्‍या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दुसरीकडे, मुंबई- गोवा महामार्गावर मंगळवारी पहाटे खासगी बसच्या अपघाताचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधकांनी मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले. सरकारच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोपी विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विनोद तावडे यांनी केला आहे.