आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नामी गुप्तहेराने IAS कडून घेतली 1 कोटींची खडणी, असा अडकला ट्रॅपमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुप्तहेर सतीश मांगले आणि त्याची पत्नी श्रद्धा मांगले... - Divya Marathi
गुप्तहेर सतीश मांगले आणि त्याची पत्नी श्रद्धा मांगले...
मुंबई- ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सतीश मांगले या नामी खासगी गुप्तहेराला एक कोटी रूपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जात होती. समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार झाल्याचे पुढे आल्यानंतर काही महिन्यापूर्वी मोपलवार यांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. काय आहे प्रकरण....
 
- सतीश व श्रद्धा मांगले, त्यांचा मित्र अनिल मेहता यांनी मोपलवार यांना मागच्या आठवड्यात नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे बोलावून घेतले. 
- तुमच्या विरुद्धचे भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेतो. तसेच कॉल रेकॉर्डिंग आॅडिओ क्लीप सुद्धा परत देतो. मात्र त्यासाठी १० कोटी रुपये द्यावे लागेल, असे त्याने सांगितले हाेते. 
- ३१ आॅक्टोबर रोजी मोपलवार यांच्याशी चर्चा करून ७ कोटी रुपयांपर्यंत तडजोडही झाली हाेती. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास मोपलवार अाणि त्यांची मुलगी तन्वी हिला गुंडांकडून ठार मारण्याची धमकी मांगले दांपत्याने दिली होती.
-  मात्र, या धमकीला न घाबरता मोपलवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पाेलिसांनी तक्रारीची खातरजमा करुन मांगले भाड्याने राहत असलेल्या डोंबिवलीतील लोढा रिव्हर व्ह्यू इमारतीच्या सतराव्या मजल्यावर सापळा लावला. 
- तेथे माेपलवार यांच्याकडून एक कोटीची खंडणी स्वीकारताना मांगले पती-पत्नीस रंगेहाथ पकडण्यात आले. 
 
मोपलवार- मांगले यांची अशी झाली ओळख-
 
- मोपलवार यांचे त्यांच्या पत्नीबरोबर घटस्फोटाचे प्रकरण प्रलंबित होते. त्यासंदर्भात काही कामासाठी त्यांनी सतीश मांगले या खासगी गुप्तहेराची मदत घेतली होती. 
- मात्र, मांगले याने माेपलवार यांच्याशी जवळीकीचा फायदा घेत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान मोपलवार यांची कथित आॅडिओ टेप वृत्तवाहिनीवर प्रसारित केली होती.
- त्यामध्ये मोपलवार एक भूखंड बिल्डरांना देण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करत असल्याचा दावा करण्यात आला होता. 
- त्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारला घेरल्यानंतर मोपलवार यांच्याकडील समृद्धी महामार्गाचे मुख्य अधिकारी पद काढून घेण्यात आले होते. 
- तसेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. सध्या मोपलवार यांची एसआयटीकडून चौकशी चालु आहे.
 
गुप्तहेर मांगलेवर बलात्काराचा आरोप, तर पत्नी तथाकथित अभिनेत्री-
 
- मांगले दांपत्याकडून पाेलिसांनी दोन लॅपटॉप, ५ मोबाइल हँडसेट, ४ पेनड्राइव्ह, १५ सी.डी. तसेच अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केली आहेत. 
- सतीश याचे १० वीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या तो खासगी गुप्तहेराचे काम करत होता. त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. 
- तसेच मीरा रोड येथे बलात्काराचा गुन्हादेखील दाखल आहे. त्याच्याबरोबरचे दोन आरोपी सध्या फरार आहेत.
- त्याची पत्नी श्रद्धा मांगले अभिनेत्री असल्याचे सांगते. काही छोटे-मोठ्या ठिकाणी तिने काम केले आहे.
- तिची ब-याच बॉलिवूडमंडळीशी ऊठबस असल्याचे दिसून येते. सध्या श्रद्धा बोरीवलीत सलून अॅंड स्पा चालवते.
- मोपलवार प्रकरणात आपल्यावर ट्रॅप लावल्याचे समजताच दोघे पती-पत्नी श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होते.
- मात्र, त्याआधीच मोपलवार त्यांच्या फ्लॅटवर पैसे घेऊन गेले आणि खंडणीविरोधी पथकाने या जोडप्याला १ कोटी रूपये घेताना रंगेहाथ पकडले.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या जोडप्याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...