आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणात होणार खासगी विद्यापीठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्राथमिक शाळा शिकला की कोकणचा मुलगा मुंबईत कामास येतो. त्यामुळे कोकणात गुरुजीपासून डॉक्टरपर्यंत सर्व घाटावरले नोकरशहा असतात. कोकणाच्या या शैक्षणिक मागासलेपणाबाबत नेहमीच ओरड होते. कोकणची शैक्षणिक परवड आता थांबवण्याची चिन्हे आहेत. कारण, तळकोकणात म्हणजे सावंतवाडीमध्ये एक खासगी विद्यापीठ स्थापन होत आहे.

राज्यात खासगी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत राज्य विधिमंडळाने कायदा संमत केल्यानंतर शासनाकडे एकूण 14 प्रस्ताव आले आहेत. त्यातील चार विद्यापीठांच्या सर्व मंजुरी मार्गी लागल्या आहेत. आता सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे राज्यातील पाचवे खासगी विद्यापीठ स्थापन होण्याच्या मार्गावर आहे. नवी मुंबईचे राय फाउंडेशन कोकणात विद्यापीठ स्थापन करू इच्छित आहे. या विद्यापीठाचे नाव ‘मराठा राय विद्यापीठ’ असे असेल. या विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला आहे. शासनाने छाननीसाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास खोले आहेत. अजिंक्य, अमिटी (मुंबई) आणि एमईटी, स्पायसर (पुणे) या चार खासगी विद्यापीठाचे प्रस्ताव मंजूर झाले असून आता राज्यातल्या पाचव्या खासगी विद्यापीठाचे काम मार्गी लागले आहे.