आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Privilege Motion Against Writer Shobhaa De News In Marathi

वादग्रस्त ट्‍वीट करणार्‍या शोभा डे यांना नोटीस, एका आठवड्यात उत्तर मागितले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रसिद्ध स्तंभलेखिका शोभा डे यांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हक्कभंगाप्रकरणी नोटीस बजावली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांनी विधानसभेत आणलेल्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला एका आठवड्याच्या आत उत्तर द्यावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. शोभा डे यांचे उत्तर आल्यानंतरच त्यांच्यावर हक्कभंग दाखल करून घ्यायचा की नाही, यामुद्यावर निर्णय घेतला जाणार आहे.

मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राइमटाइम देण्याचा आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर शोभा डे यांनी आक्षेपार्ह ट्वीट केले होते. त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत डे यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.

या प्रस्तावावर शोभा डे यांनी दुसरे ट्‍वीट केले आहे होते. त्या म्हणाल्या, ' माफी मागण्यासाठी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला? कम ऑन, महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे, तसेच माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील.'

मराठी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी डे यांनी सर्व जनतेची माफी मागावी, प्रताप सरनाईक म्‍हटले आहे.

'या सरकारने आधी गोवंश हत्या बंदी, आता मराठी सिनेमा, नको नको, ये सब रोको,' असे ट्‍वीट शोभा डे यांनी केले आहे. यानंतर डे यांच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीने डे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेने डे यांच्याविरोधात मोर्चा काढून त्यांना वडा पाव आणि दहीमिसळ पाठवली होती.
त्यावर डे यांनी 'धन्यवाद' असे ट्‍वीट केले होते.
दरम्यान, राज्यातील मल्टिप्लेक्स मालकांनी प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणे आणि चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवणे सरकारने मंगळवारी बंधनकारक केले. 'ज्या महाराष्ट्रावर आम्ही प्रेम करतो, तो हा महाराष्ट्र नाही. माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे. ते कुठे आणि कधी पाहावेत हे मला ठरवू द्या. देवेंद्र फडणवीस तुमची दादागिरी नको.', असे ट्‍वीट करून शोभा डे यांनी फडणवीस सरकारला हुकूमशहा संबोधले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शोभा डेंचे टि्वट 'फारच चविष्ठ! धन्यवाद शिवसेना'