आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Professors Appoint Now On Reservation, State Government Decision

प्राध्यापकांसाठी यापुढे संवर्गनिहाय आरक्षण, राज्य शासनाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाविद्यालयातील विषयनिहाय आरक्षणाच्या धोरणामुळे सामाजिक आरक्षणातील सर्व मागास प्रवर्गांना त्याचा लाभ होत नव्हता. त्यामुळे प्राध्यापक पदासाठी यापुढे संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये विषयनिहाय आरक्षण धोरण राबवण्यात येत होते. महाविद्यालयांचे विभाग विद्यापीठीय विभागांप्रमाणे मोठे नसतात. त्यामुळे पहिली जागा खुल्या, तर दुसरी जागा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांला मिळायची. विषयनिहाय आरक्षणामुळे अनुसूचित जमाती, भटके विमुक्त आणि इतर मागासवर्ग या संवर्गांना संधीच मिळत नव्हती.
विषयनिहाय आरक्षणाच्या धोरणामुळे सर्व मागास प्रवर्गांना लाभ होत नव्हता. त्यामुळे प्राध्यापकपदास संवर्गनिहाय आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणी विविध स्तरावरून शासनाकडे सातत्याने करण्यात येत होती. राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भात गेल्या बुधवारी शासन निर्णय जारी केला आहे. महाविद्यालयातील एकाच शिक्षकीय संवर्गातील सर्व विषयांतील मंजूर पदे एकत्रित करण्यात यावीत व त्यास शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे संवर्गनिहाय आरक्षण लावण्यात यावे, असे नमूद केले आहे.