आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: कबड्डीचा आजपासून थरार, बिग बींनी मराठीत गायले \'ले पंगा\' गाणे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रो कबड्डी लीग’च्या दुस-या हंगामाचा थरार आजपासून पाहायला मिळणार आहे. मुंबईत गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्स आणि यजमान यू मुम्बा यांच्या लढतीने त्याची सुरुवात होईल. त्या आधी प्रो कबड्डी लीगचे उद्घाटन सोहळा पार पडेल. या सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे राष्ट्रगीत गाणार आहेत. तसेच त्यांनी गायलेली ले पंगा हे मराठीतील गाणेही सादर केले जाणार आहे.
सलामीचा सामना यू मुंबा आणि जयपूर संघात रात्री आठवता सुरु होईल. दोन्ही संघ गेल्यावर्षी विजेते व उपविजेते ठरल्याने हा सामनाही अत्यंत रोमांचक असा होईल अशी सर्वांना आशा आहे. यू मुंबा आणि जयपूर संघाच्या लढतीनंतर रात्री 9 वाजता बंगळुरू आणि कोलकाता संघात सामना रंगेल. यंदा या स्पर्धेत मुंबई, कोलकाता, जयपूर, पाटणा, हैदराबाद, पुणे, बंगळुरू आणि दिल्ली हे आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यंदा प्रत्येक संघाला 14 ऐवजी 25 खेळाडूं ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे भारतासह एकूण 13 देशांच्या खेळाडूंचा समावेश असलेली यंदाची प्रो कबड्डी लीग स्पर्धा अधिक थरारक ठरणार आहे.
18 जुलै ते 23 ऑगस्ट या कालावधीत ही लीग खेळवली जाईल. गत हंगामात एकूण 435 कोटी प्रेक्षकांनी ही लीग पाहिली होती. यंदाही कबड्डी लीगचे सामने जगभरात थेट प्रक्षेपित केले जाणार असून 600 कोटी प्रेक्षक हे सामने पाहतील, असे सांगितले जात आहे. 100 देशांमध्ये प्रो कबड्डी लीग सामने दाखवण्यात येणार आहेत. अमेरिका, इंग्लंड, मध्यपूर्वेकडील देश तसेच दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्येही प्रो कबड्डी लीगचे सामने प्रक्षेपित होणार आहेत. कबड्डीला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी इंग्रजीसोबतच हिंदी, मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषांमधून सामन्याचे धावते समालोचन करण्यात येणार आहे.
पुढे पाहा, प्रो कबड्डी लीग छायाचित्रांच्या माध्यमातून... सलमान खाननेही म्हटले ले पंगा...
बातम्या आणखी आहेत...