मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची यूएईमध्ये तब्बल पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. यूएई सरकारने ही संपत्ती गोठवण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, त्या बाबत माहिती भारत सरकारला माहिती दिली आहे. दरम्यान, दाऊदने आपल्या संपत्तीमधील मोठा वाटा त्याची थोरली मुलगी माहरुख आणि जावाई जुनैद यांच्या नावावर केला असल्याचे चौकशीमधून समोर आले. माहरुख हिचे लग्न पाकिस्तानचे माजी क्रिकेटर जावेद मियादाद यांचा मुलगा जुनैद मियादांद याच्यासोबत झालेले आहे.
अफ्रीका आणि दुबईमध्ये प्रॉपर्टी
एका मीडिया वृत्तानुसार, दाऊदवर तयार झालेल्या नवीन डॉजियरमध्ये अल नूर डायमंड्स, ओएसिस पॉवर एलसीसी नावाचे दाऊदचे फर्म आहेत. शिवाय डॉलफिन कंस्ट्रक्शन, ईस्ट-वेस्ट एयरलाइन्स, किंग व्हीडियो आणि मोइन गारमेंट्स नावाच्या कंपन्यासुद्धा दाऊदच्या नावावर आहेत. दाऊदने यातील बहुतांश कंपन्या मोठी मुलगी आणि जावाई यांच्या नावावर केल्या आहेत.
डी कंपनीचे सदस्य पाहातात कारभार
दाऊदच्या बहुतांश कंपन्या आणि संपत्ती त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे आहे. मात्र, या सर्वांचा कारभार डी कंपनीचे सदस्य पाहतात. डॉजियरमध्ये फ़िरोज नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे. जो की ओएसीस ऑयल अॅण्ड लूब एलसीसी आणि अल नूर डायमंड्सचे काम पाहतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा दाऊदच्या मुलीचे निवडक फोटोज...