आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्राणीने महिला कैद्यांना आंदोलनासाठी भडकावले, मुखर्जीसह 200 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील भायखळा तुरुंगात महिला कैद्यांनी दाेन दिवसांपूर्वी केलेल्या हिंसक आंदोलनाला शिना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने फूस लावली होती, असे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसह  २०० महिला कैद्यांवर दंगल घडवून अाणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
भायखळा तुरुंगातील महिला कैदी मंजुळा शेटे (३५) हिचा शुक्रवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महिला कैद्यांनी तुरुंगाच्या गच्चीवर शनिवारी आंदोलन केले होते. तसेच या वेळी कैद्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली होती. रस्त्यावरील एका व्यक्तीने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. इंद्राणीने महिला कैद्यांना हिंसक आंदोलन करण्यासाठी फूस लावली. तसेच लहान मुलांचा ढालीसारखा उपयोग करण्यास इतर कैद्यांना सांगितल्याचे पाेलिसांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या तुरुंगातील महिला कैद्यांना सहा वर्षापर्यंतच्या मुलांना सोबत ठेवण्यास परवानगी आहे.  

पाच पोलिसांवरही गुन्हा  
२३ जून रोजी मंजुळाने खानावळीतून अंडी चोरली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप इतर महिला कैद्यांनी  केला आहे. तसेच शवविच्छेदन अहवालातही तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर तुरुंगाधिकारी अधीक्षक मनीषा पोखरकर आणि इतर पाच पोलिसांविरोधात  हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...