आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई- दिघ्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई, रेल रोको आंदोलन, महिलांना घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एमआयडीसीच्या भूखंडावर दिघा येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने कारवाईस सुरूवात केली आहे. सोमवारी सकाळपासून महापालिकेचे अधिकारी कारवाई करत आहे. मोरेश्वर इमारतीसह 3 इमारती सील करण्यास सुरुवात केल्याने परिसरातील नागरिक संतापले आहेत. दिघा वासियांनी रेल रोको आंदोनल केले दाहे. पोलिसांनी आंदोलन करणार्‍या महिलांना ताब्यात घेतले आहे.

दुसरीकडे, कळवा आणि ठाणे स्थानकाजवळ जनआंदोलन सुरू झाले आहे. दिघा वासिय देखील रेल्वे रुळावर उतरले आहेत. वाशीहून ठाण्याकडे जाणारी रेल्वे रोखून धरण्यात आली आहे. परिणामी डाऊन स्लो, अप स्लो आणि डाऊन फास्ट लोकलची वाहतूक खोळंबली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलन करणार्‍या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे हे प्रकरण?
एमआयडीसीच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई हायकोर्टाने 7 फेब्रुवारीला दिघ्यातील मोरेश्वर, भगतजी आणि पांडुरंग तीन इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज, सोमवारी सकाळपासून नवी मुंबई महानगरपालिकेचे पथक दिघ्यात पोहोचले. पथकाने पोलिसांची मदत घेतली आहे. मात्र, नागरिकांनी घरातून बाहेर पडण्यास अधिकार्‍यांना स्पष्ट नकार दिला. महिलांनी यात आघाडी घेतली आहे. कारवाईला विरोध करणार्‍या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, दिघ्यातील एकूण 99 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीच्या भूखंडावरील मोरेश्वर, भगतजी आणि पांडुरंग या तीन इमारती सोमवारी सील करण्यात येणार आहेत. सध्या ही कारवाई सुरू आहे. 

दिघ्यातील 99  बेकायदा इमारतींपैकी आतापर्यंत केरू प्लाझा, शिवराम आणि पार्वती या इमारती पूर्वीज जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर अंबिका व कमलाकर या इमारती सील करून एमआयडीसीच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. त्या पाठोपाठ मोरेश्वर  भगतजी आणि  पांडुरंग या इमारतींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने बेकायदा इमारती नियमित करण्याबाबत तयार केलेल्या धोरणावर येत्या 22 फेब्रुवारीला कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, निकाल येण्याआधीच महापालिकेने नागरिकांना घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहे. 
बातम्या आणखी आहेत...