आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Provide Relief To Hailstorm Hit Farmers In 5 Days: Munde

पाच दिवसांत मदत न दिल्यास भाजप रस्त्यावर - गोपीनाथ मुंडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘गारपिटीने राज्यातील बळीराजाचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. या गारपीटग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. येत्या पाच दिवसांत सरकारने गारपीटग्रस्तांना मदत न केल्यास भाजप रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी वरळीत आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

‘राज्यात 28 जिल्ह्यांत गारपीट झाली. त्यात 25 हजार घरांची पडझड झाली असून 22 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यावर ऐतिहासिक, अस्मानी संकट ओढवलेले असताना शासन व प्रशासन मात्र थंड गोळ्यासारखे बसून आहे. शेतीचे पंचनामे चालू आहेत. मात्र, केवळ कोरडवाहू शेतीचेच पंचनामे करण्यात येत आहेत. ज्या बागायती शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना सरकारी मदतीपासून वंचित ठेवण्याचा यामागे डाव आहे,’ असा आरोप मुंडे यांनी केला.

राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा : शेतकर्‍यांवर अस्मानी संकट ओढवलेले आहे. त्याची पर्वा न करता जिल्हा आणि राष्ट्रीय बँका कर्जवसुलीसाठी शेतकर्‍यांना तगादा लावत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. कर्जवसुली थांबवण्यात यावी तसेच शेतकर्‍यांना वीज बिल माफ करावे. शेतकर्‍यांचे नुकसान लाखांत झाले आहे. मात्र त्याची भरपाई चारदोन हजारांत करण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यातील गारपीट ‘राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा’ तसेच गारपीटग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची मागणीही मुंडे यांनी केली.

कुटुंबाला पोरके करू नका : निवडणूक आचारसंहितेचा बाऊ करत शासन गारपीटग्रस्तांना मदत देण्यास विलंब लावत आहे. गारपीटग्रस्तांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, त्यासाठी नुकसान भरपाईचे पारंपरिक निकष बदलावेत, अशी मागणी
मुंडे यांनी या वेळी केली.

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वेळेत मदत मिळाली नाही. त्यामुळे राज्यात 22 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या करुन आपल्या कुटुंबाला शेतकर्‍यांनी पोरके करु नये, असे आवाहनही मुंडेंनी केले.

फडणवीसच राज्यात सर्वोच्च
देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष या नात्याने भाजपचे राज्यातील सर्वोच्च् नेते असून पक्षातील महत्त्वाच्या घडामोडीवर त्यांचे मत निर्णायक असेल, अशी कबुली गोपीनाथ मुंडे यांनी दिली. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा शिवसेनेविषयीचा सूर बदलणे साहजिक आहे. राणे यांच्या वेदना आमच्याइतक्या चांगल्या कोणीही समजून घेणार नाहीत, असा टोलाही मुंडे यांनी लगावला.